crypto currency
crypto currency Google
विज्ञान-तंत्र

क्रिप्टो क्रेडिट कार्ड म्हणजे काय? कसे मिळतात रिवॉर्ड्स; जाणून घ्या सविस्तर

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : क्रेडिट कार्डकडे खरेदीसाठी एक सहज आणि सोपा पर्याय म्हणून पाहिलं जातं. यावर विशिष्ट खरेदीवर खास रिवॉर्ड पॉईंट्सही मिळतात. बँकांच्या या क्रेडिट कार्ड्सबरोबरच आता गेल्या काही काळापासून क्रिप्टो करन्सी (Crypto Currency) आणि त्याचं क्रेडिट कार्ड्सही (Credit Cards) आता दाखल झाले आहेत.

पारंपारिक क्रेडिट कार्ड्समध्ये आपण भारतीय रुपयांमध्ये व्यवहार करतो. त्याचप्रकारे क्रिप्टो क्रेडिट कार्ड पूर्णपणे क्रिप्टोकरन्सीवर आधारीत आहे. यामध्ये रिवार्ड पॉईंट्सही क्रिप्टो करन्सीत मिळतात. कंपनी तुम्हाला क्रिप्टो कार्ड देऊ करते, ज्याद्वारे तुम्ही खर्च करु शकता आणि नंतर त्याचं पेमेंट करु शकता.

क्रिप्टोमध्ये व्यवहार आणि क्रिप्टोमध्येच पेमेंट

सामान्य क्रेडिट कार्ड आणि क्रिप्टो क्रेडिट कार्डच्या काम करण्याच्या पद्धतीत कोणताही फरक नाही. फरक फक्त इतकाच आहे की, यामध्ये संपूर्ण व्यवहार हा क्रिप्टोकरन्सीमध्ये होतो. म्हणजेच तुम्हाला क्रेडिट कार्डचं पेमेंटही क्रिप्टोकरन्सीत करावं लागतं.

कंपनी देतेय अशा प्रकारचे रिवॉर्ड्स

क्रिप्टोकरन्सी देणाऱ्या कंपन्या हे क्रेडिट कार्ड इश्यू करतात. वेगवेगळ्या कंपन्यांच्या क्रेडिट कार्ड्सवर वेगवेगळ्या प्रकारे रिवॉर्ड्स दिले जात आहेत. उदाहरणार्थ जेमिनी क्रेडिट कार्डवर बिटकॉइनवर तीन टक्के पेबॅक मिळतो. हा पेबॅक तात्काळ खरेदीनंतर युजरच्या जेमिनी खात्यावर जमा केलं जातं. तर ब्लॉकफाई क्रेडिट कार्ड युजर दीड टक्के कॅशबॅक देतो. यामध्ये खास गोष्ट ही आहे की, तुम्ही हा कॅशबॅक बिटकॉइन आणि इथिरिअम सारख्या १० प्रकारच्या क्रिप्टोकरन्सीमध्ये प्राप्त करु शकता. याच प्रकारे सोफाई, वेन्मो क्रेडिट कार्ड देखील याचप्रकारे रिवॉर्ड्स देत आहेत.

वापरकर्त्यानं या बाबींवर विशेष लक्ष देणं गरजेचं

इथं एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे पारंपारिक क्रेडिट कार्डप्रमाणं क्रिप्टो क्रेडिट कार्ड देखील पेमेंट करण्यास उशीर झाल्यास अतिरिक्त व्याज द्यावं लागतं. तसेच महागड्या क्रिप्टोच्या किंमती आपल्या खिशाला मोठी कात्री लावू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal: स्वाती मालिवाल प्रकरण तापणार; दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल

'जिरेटोप देणाऱ्याला डोकं नाही अन् घालून घेणाऱ्यालाही डोकं नाही'; उद्धव ठाकरेंचा भर पावसात हल्लाबोल

CM Eknath Shinde : त्यांच्यासोबत पाकिस्तानची बोली बोलणारे बसतात; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

RCB vs DC Stale Food : कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या अडचणीत वाढ; आरसीबी - दिल्ली सामन्यात शिळं जेवण दिल्याप्रकरणी FIR दाखल

Latest Marathi News Live Update : कोकणातील खेड मध्ये गारा पडल्या

SCROLL FOR NEXT