Aadhar Virtual ID esakal
विज्ञान-तंत्र

Aadhar Virtual ID : आधार व्हर्चुअल ID कार्ड आहे खूप कामाचं; कसं बनवून घ्याल? ही आहे सोपी ऑनलाईन प्रोसेस

Aadhar Virtual ID How to Create Virtual Aadhar : आधार क्रमांक (UID) उघड करण्याची गरज न पडता तुम्ही आता 'आधार व्हर्चुअल आयडी' (VID) वापरू शकता.

Saisimran Ghashi

Aadhar Card Tips : आजच्या काळात आधार कार्ड आपल्याला सर्व कामांसाठी आवश्यक आहे. शाळेत प्रवेशापासून ते बँक अकाउंट उघडणे, नोकरी मिळवणे आणि घर भाड्याने घेणे यासारख्या सर्व कामांसाठी आधार कार्ड लागते.

आधार कार्ड वापरणे आता सोपे आणि सुरक्षित होणार आहे. आधार क्रमांक (UID) उघड करण्याची गरज न पडता तुम्ही आता 'आधार व्हर्चुअल आयडी' (VID) वापरू शकता.

व्हर्चुअल आयडी म्हणजे काय? (What is Virtual Aadhar ID)

व्हर्चुअल आयडी ही तुमच्या आधार कार्डाची १६ अंकी असलेली तात्पुरती ओळख आहे. ही आयडी वापरून तुम्ही बँका, मोबाईल कंपन्या यासारख्या सेवा पुरवठादारांकडे तुमची ओळख सिद्ध करू शकता. त्यामुळे तुमच्या आधार कार्डाचा मूळ क्रमांक कोणाशीही शेअर करावा लागणार नाही.

व्हर्चुअल आयडी मिळवण्यासाठी काय करावे?

व्हर्चुअल आयडी मिळवणे खूप सोपे आहे. तुम्ही ती UIDAI ची अधिकृत वेबसाइट (uidai.gov.in) वरून काही मिनिटांमध्ये काढू शकता.

UIDAI वेबसाइटवर वर्चुअल आयडी कशी काढायची?

१. UIDAI च्या वेबसाइटवर जा.

२. मेन पेजवर तुम्हाला 'Virtual ID (VID) Generator' असा पर्याय दिसणार आहे. त्यावर क्लिक करा.

३. यावर क्लिक केल्यावर नवीन पेजवर तुमचा आधार क्रमांक, सिक्युरिटी कोड आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेला OTP भरावा लागणार आहे.

४. OTP भरल्यानंतर 'Generate VID' किंवा 'Retrieve VID' यापैकी पर्याय निवडा.

काही टिप्स

Generate VID - पहिल्यांदाच व्हर्चुअल आयडी मिळवण्यासाठी.

Retrieve VID - आधी काढलेली व्हर्चुअल आयडी विसरला असाल तर ती पुन्हा मिळवण्यासाठी.

आता तुम्ही तुमच्या आधार कार्डाची माहिती सुरक्षित ठेवून या ऑनलाईन सेवांचा सहज वापर घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan-Dombivli meat sale ban: मांस विक्रीवरील बंदीच्या निर्णयावर 'कल्याण-डोंबिवली' महापालिका आयुक्त गोयल ठाम!

Sanju Samson साठी राजस्थान रॉयल्सने सुरू केली दुसऱ्या संघाची शोधाशोध; CSK संघ शर्यतीतून बाहेर?

Bihar SIR: बिहारची एसआयआर मोहीम मतदारांप्रती अनुकूल; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

Pune Metro Update: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! १५ ऑगस्टपासून मेट्रो गर्दीच्या वेळी दर सहा मिनिटांनी धावणार

Latest Marathi News Updates Live: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

SCROLL FOR NEXT