विज्ञान-तंत्र

Whatsappने आणलं नवं फीचर; चॅटिंग होणार आणखी सेफ

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : Whatsapp मेसेंजर लवकरच नवीन फीचर आणणार आहे. या फिचरमुळे चॅटिंग आणखीनच सेफ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ‘फिंगरप्रिंट लॉक’नावाचं हे फीचर असून लेटेस्ट बीटा व्हर्जनमध्ये हे फीचर उपलब्ध देखील झाले आहे.

व्हॉट्सअॅप वापरणाऱ्याच्या फिंगरप्रिंटशिवाय इतर कोणालाही आता व्हॉट्सअॅप उघडता येणार नाही.(ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) त्यामुळे त्याची चॅटिंग आता त्याच्या परवानगीशिवाय दुसरा कोणीही पाहू शकणार नाही. जर तुमच्याकडे याचे लेटेस्ट व्हर्जन असेल तर Whatsappच्या सेटिंगमध्ये जाऊन अकाउंट पर्याय निवडल्यानंतर प्रायव्हसी सेटिंगमध्ये जाऊन तुम्हाला हे फीचर अॅक्टिव्ह करता येणार आहे.

व्हॉट्सअॅपवर पाठवलेला मेसेज सुरक्षित असल्याचे नेहमी सांगण्यात येते परंतु, पण तरीही आपल्याला आपली चॅटिंग कोणीतरी पाहील याचा धोका वाटत असतो. पण, आता फिंगरप्रिंट लॉक या फिचरमुळे परवानगीशिवाय व्हॉट्सअॅप उघडता येणार नाही. मोबाइल फोनमधील फिंगरप्रिंट सेन्सरचा यासाठी उपयोग होईल. या फीचरमध्ये ऑटोमॅटिकली लॉकसाठी तीन पर्याय असणार आहेत. यातील पहिला पर्याय म्हणजे तातडीने लॉक करण्याचा, दुसरा पर्याय एक मिनिटानंतर आणि तिसरा पर्याय 30 मिनिटांनंतर लॉकचा असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT