WhatsApp News esakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp News : व्हॉट्सअपची मोठी घोषणा! पाठवलेला मेसेज 'एडिट' करता येणार; झुकरबर्ग म्हणाले...

संतोष कानडे

नवी दिल्लीः सर्वात जास्त वापरलं जाणारं मेसेजिंग App व्हाट्सअपकडून मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. युजरने सेंड केलेला मेसेज काही वेळेच्या मर्यादेत एडिट करता येणार आहे.

Meta CEO Mark Zuckerberg यांनी ही घोषणा केली असून त्यासंबंधीच एक फेसबुक पोस्टदेखील त्यांनी केलीय. त्यामध्ये त्यांनी व्हॉट्सअपवर पाठवलेला मेसेज युजर एडिट करु शकेल, असं म्हटलंय.

मार्क झुकरबर्ग यांनी पोस्टमध्ये म्हटलंय की, व्हॉट्सअपवर पाठवलेला मेसेज १५ मिनिटांच्या मर्यादेत एडिट करता येईल. युजरला मेसेज एडिट करण्यासाठी पाठवेल्या मेसेजवर प्रेस करुन होल्ड करावं लागेल. त्यानंतर पुढे एक एडिट ऑप्शन दिसेल. त्याद्वारे पाठवलेला मेसेज एडिट करता येईल.

महत्त्वाचं म्हणजे एडिट केलेल्या मेसेजला 'Edited' असा टॅग लागणार आहे. त्यामुळे मेसेज वाचणाऱ्याला हा मेसेज एडिट केलेला आहे, हे लक्षात येईल. टेलिग्राम मेसेजिंग अॅपवर ही सुविधा पूर्वीपासूनच आहे. यासह Signal अॅपवरही मेसेज एडिट करता येतो.

'मेटा'च्या माहितीनुसार हे फिचर सगळ्या युजर्ससाठी देण्यात येईल. परंतु हे फिचर येण्यासाठी काही आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. यासाठी युजर्सना वारंवार WhatsApp अपडेट करुन चेक करावं लागेल. विशेष म्हणजे Android सह iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवर हे फिचर दाखल होणार आहे.

फसवणूक करणाऱ्या कॉल्सवर निर्बंध

मागील काही दिवसांमध्ये व्हॉट्सअपवर आंतरराष्ट्रीय कॉल्स वाढले आहेत. त्यामुळे आर्थिक नुकसान होण्याचा मोठ्या प्रमाणावर धोका आहे. हे कॉल्स इंडोनेशइया, व्हिएतनाम, मलेशइया आदी देशांमधून येत आहेत. हे कॉल्स +251, +62, +254, +84 अशा क्रमांकावरुन येतात. व्हॉट्सअॅपने याबाबत अशा कॉल करणाऱ्यांवर प्रतिबंध करत असल्याचं मागच्या आठवड्यात म्हटलं आहे. शिवाय युजर्सना ब्लॉक आणि रिपोर्ट, असे पर्याय उपलब्ध असल्याचं निवेदनात स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: उजनी धरणातून विसर्ग वाढविला, भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT