Know When to Change Your Car Engine Oil for Optimal Performance esakal
विज्ञान-तंत्र

Car Oil Change : तुमच्या कारमधलं ऑईल नेमकं कधी बदलावं? आत्ताच जाणून घ्या

Car Engine Oil Change Duration : कारचे ऑईल नियमितपणे बदलणे हे वाहनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य वेळी ऑईल बदलल्यास गाडीची कार्यक्षमता वाढते आणि दीर्घकाळ टिकते.

Saisimran Ghashi

Car Engine Oil Change : तुमच्याकडे चारचाकी गाडी असेल तर वेळच्या वेळी ऑईल बदलणं ही एक छोटी, पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. सहसा सर्व्हिसिंगमध्येच हे काम केले जात असते. तरीही तुम्ही याकडे लक्ष देणे गरजेचे असते. सर्वसामान्यत: असं सांगितलं जातं की दर तीन महिन्यांनी किंवा दर ५,००० किलोमीटर्सनंतर गाडीतील ऑईल बदलले जावे. पण अलीकडे तंत्रज्ञानात झालेल्या सुधारणांमुळे आता हे निकष थोडे सैलपणे पाळले तरीही चालू शकतात.

पण अतिसक्रियता दाखवत तुम्ही गाडीतील ऑईल सतत बदलत राहिलात, तरीही गाडीच्या दृष्टीने ते फायदेशीर ठरत नाही. अर्थात त्याचे अपाय होणार नाहीत; पण पैसे, वेळ आणि श्रम सगळे वाया जाऊ शकते.

गाडीतील ऑईल बदलण्यासाठीचे हे निकष वाचा

- दर सहा महिन्यांनी किंवा दर १,६०९ किलोमीटर्सनंतर

- दर ४,८२८ किलोमीटर्सनंतर

- दर ८,००० ते १२,०७० किलोमीटर्सनंतर

गाडीतील ऑईल नियमित बदलले तरीही आणखी एका गोष्टीकडेही लक्ष ठेवावे लागते. ते म्हणजे ऑईल फिल्टर्स बदलणे. तुमच्या गाडीतील ऑईल फिल्टर्स कधी बदलायचे, यासंदर्भात गाडीच्या मॅन्युअलमध्ये माहिती दिलेली असते.

दर दीड हजार किलोमीटर्सने ऑईल का बदलावे?

गाडीतील ऑईलच्या बदलाचा कालावधी ठरवण्याचा मुख्य घटक म्हणजे गाडी चालवण्याची तुमची पद्धत किंवा सवय. तुमचा रोजचा प्रवास १६ किलोमीटर किंवा त्यापेक्षा कमी असेल तर जवळपास ५००० किलोमीटर्स गाडी चालल्यावर ऑईल बदलले तरीही चालू शकेल. ऑईल बदलण्याचा विचार करताना तुमचा रोजचा प्रवास, गाडीची स्थिती, प्रवासाचा सरासरी वेग इत्यादी गोष्टींवर आवर्जून लक्ष द्या.

गाडीतील ऑईलसंदर्भात नेहमी पडणारे प्रश्न अन् त्यांची उत्तरं

1.खूप दिवस गाडी चालवलीच नाही तरीही ऑईल खराब होते का?

गाडीसाठी सर्व्हिसिंगचा कालावधी आणि त्यासाठीचे ढोबळ निकष नमूद केलेले असतात. त्या कालावधीत तुमच्या गाडीचा वापर खूपच कमी होत असला तरीही वर्षातून दोनदा ऑईल बदलण्याचा सल्ला सामान्यत: दिला जातो.

2.मी गाडीतील ऑईल बदलण्यास मेकॅनिकला कधी सांगू?

तुमची गाडी नवीन असेल आणि सामान्यत: रोज २० मिनिटांच्या आसपास प्रवास होत असेल आणि गाडीचा वेगही स्थिर असेल तर तुम्ही दीर्घ कालावधीनंतर ऑईल बदललेले चालू शकते. पण तुमची गाडी जुनी असेल तर मात्र कंपनीने मॅन्युअलमध्ये नमूद केलेल्या कालावधीनुसारच ऑईल बदलले जावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT