Old Smartphone Sell eSakal
विज्ञान-तंत्र

Old Smartphone Sell : जुना फोन विकायचा असेल तर 'या' साईट्स ठरतील चांगला पर्याय! जाणून घ्या कोणत्या

जुन्या फोनची चांगली किंमत मिळवणं हे खरंतर अवघड काम आहे. मार्केटमध्ये जाऊन जुने फोन विकत घेतील अशी दुकानं शोधणंही सर्वांना शक्य होत नाही.

Sudesh

Best Websites to Sell Old Smartphone : सध्या तंत्रज्ञान हे अगदी वेगाने प्रगती करत आहे. स्मार्टफोन मार्केटमध्ये तर दर आठवड्याला नवनवीन मॉडेल्स लाँच केले जात आहेत. आधीपेक्षा तगडे फीचर्स असणारे हे फोन घेण्याची इच्छा तर होते, मात्र आधीच एक फोन घेतला असल्याने ती पूर्ण करता येत नाही अशी स्थिती बऱ्याच जणांची होते. मात्र, अशा वेळी जुना स्मार्टफोन विकणे हा एक चांगला पर्याय आहे.

जुन्या फोनची चांगली किंमत मिळवणं हे खरंतर अवघड काम आहे. मार्केटमध्ये जाऊन जुने फोन विकत घेतील अशी दुकानं शोधणंही सर्वांना शक्य होत नाही. मात्र, आता सर्वकाही ऑनलाईन उपलब्ध असताना, तुम्ही आपले स्मार्टफोन देखील ऑनलाईनच विकू शकता. याठिकाणी किंमतही चांगली मिळते. अशाच काही वेबसाईट्सची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

इन्स्टाकॅश

जुने फोन विकण्यासाठी InstaCash हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. ही कंपनी तुम्हाला एक प्रोग्राम डाऊनलोड करण्यास सांगते. यातील अल्गोरिदम तुमच्या फोनचं मूल्य ठरवते. तुमचा फोन बंद पडला असेल, तरीही चांगल्या किंमतीला खरेदी करण्याची तयारी इन्स्टाकॅश दर्शवतं. अर्थात, फोन पिकअप करण्यासाठी हे काही चार्जेस आकारतात. (Where to sell old Smartphone)

बुदली

Budli नावाच्या वेबसाईटवर देखील तुम्ही आपले जुने फोन विकू शकता. फोनचे डीटेल्स शेअर केल्यावर लगेच तुम्हाला त्याची संभाव्य किंमत दाखवण्यात येते. तुमच्या घरी येऊन फोन नेला जातो, आणि त्यानंतर 24 तासांच्या आतमध्ये तुम्हाला पैसे मिळतात. (Best website to sell smartphone)

कॅशिफाय

जुने फोन विकण्यासाठी Cashify ही एक लोकप्रिय साईट आहे. याठिकाणी तुम्ही सेकंड-हँड फोन खरेदी देखील करू शकता. केवळ स्मार्टफोनच नाही, तर लॅपटॉप किंवा टीव्ही असे इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस देखील तुम्ही याठिकाणी विकू किंवा खरेदी करू शकता.

फ्लिपकार्ट

Flipkart ही साईट तर जवळपास सर्वांनाच माहिती आहे. याठिकाणी केवळ नवीन फोनची खरेदी नाही, तर जुन्या फोनची विक्रीदेखील करता येते. याठिकाणी फोनची किंमत तुम्हाला फ्लिपकार्ट ई-व्हाऊचर स्वरुपात मिळते. देशातील 1700 पिन कोडवर फ्लिपकार्ट पिकअप सुविधा देतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' नशेत धुंद मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT