
ACB team traps Borgaon Talathi in Koregaon Taluka while accepting bribe for land deed clearance.
रहिमतपूर : येथून जवळच्या बोरगाव (ता. कोरेगाव) येथील तलाठी रणजित अर्जुन घाटेराव (वय ३२, रा. श्री अपार्टमेंट, अहिरे कॉलनी, लक्ष्मीनगर, सातारा. मूळ रा. भोसे, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) यास एक हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. याबाबत मिळालेली माहिती अशी, की तक्रारदाराच्या वडिलांच्या मृत्यूनंतर मौजे टकले (ता. कोरेगाव) येथील गट क्रमांक १०० मधील ९० गुंठे शेतजमिनीवर वारस नोंद झाली होती.