
National Struggle Committee raises voice against alleged pension misuse affecting senior citizens.
Sakal
कऱ्हाड: ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या पेन्शनवरच केंद्र सरकारने डल्ला मारला आहे. त्यांच्या ८० लाखांहून अधिक पेन्शनधारकांचे एक लाख १६ हजार ६४ कोटी रुपये केंद्र सरकारने गायब केले आहेत. त्या विरोधात पावसाळी अधिवेशनात २१ खासदारांनी आवाज उठवला. मात्र, त्याचा परिणाम झाला नाही. त्यामुळे देशभरातील पेन्शनधारकांत तीव्र नाराजी आहे. ठोस उपाय निघत नाही, तोपर्यंत लढा कायम ठेवण्याचा पेन्शनरधारकांचा निर्धार आहे, अशी माहिती राष्ट्रीय संघर्ष समितीचे येथील अध्यक्ष लालासाहेब भिसे यांनी दिली.