OpenAI hires Pragya Misra as first employee in India Sakal
विज्ञान-तंत्र

Pragya Misra: OpenAI ने भारतात केली पहिली नियुक्ती; कोण आहेत प्रज्ञा मिश्रा ज्यांना दिली आहे महत्त्वाची जबाबदारी?

OpenAI hires Pragya Misra as first employee in India: ChatGPIT बनवणारी कंपनी OpenAIने प्रज्ञा मिश्रा यांची भारतातील पहिली कर्मचारी म्हणून नियुक्ती केली आहे. प्रज्ञा मिश्रा सध्या Truecaller येथे सार्वजनिक व्यवहार संचालकपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Who is Pragya Misra: ChatGPIT बनवणारी कंपनी OpenAIने प्रज्ञा मिश्रा यांची भारतातील पहिली कर्मचारी म्हणून नियुक्ती केली आहे. प्रज्ञा मिश्रा सध्या Truecaller येथे सार्वजनिक व्यवहार संचालकपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. या महिन्याच्या अखेरीस त्या पदभार स्वीकारू शकतात.अहवालानुसार, प्रज्ञा मिश्रा OpenAI साठी भारतातील सार्वजनिक धोरण व्यवहार प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारतील.

सॅम ऑल्टमनच्या ओपनएआय कंपनीने हा मोठा निर्णय अशा वेळी घेतला आहे जेव्हा जगभरात डीपफेक व्हिडिओ आणि कृत्रिम तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होताना दिसत आहे. देशात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकांमुळे, लोक एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर करत आहेत.

कोण आहेत प्रज्ञा मिश्रा?

लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्या जुलै 2021 पासून Truecallerमध्ये सार्वजनिक व्यवहार संचालक म्हणून काम करत आहेत. Truecaller मध्ये येण्या पूर्वी, त्यांनी फेसबुकच्या मूळ कंपनी मेटामध्ये कम्युनिकेशन मॅनेजर म्हणून तीन वर्षे काम केले होते. याशिवाय प्रज्ञा मिश्रा यांनी अर्न्स्ट अँड यंग आणि नवी दिल्लीतील रॉयल डॅनिश दूतावासातही काम केले आहे.

प्रज्ञा मिश्रा यांनी 2012 मध्ये इंटरनॅशनल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमधून एमबीएची पदवी घेतली. यानंतर त्यांनी डीयूमधून बॅचलर आणि नंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समधून बार्गेनिंग आणि निगोशिएशन डिप्लोमा पूर्ण केला आहे.

जगभरातील टेक कंपन्यांसाठी भारत ही मोठी बाजारपेठ

जगभरातील सरकार आणि कंपन्या या वेगाने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाचे नियमन कसे करायचे याचा विचार करत आहेत. 1.4 अब्ज लोकसंख्या आणि झपाट्याने वाढणारी अर्थव्यवस्था, भारत ही जगभरातील टेक कंपन्यांसाठी मोठी बाजारपेठ आहे.

ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन गेल्या वर्षी भारतात आले होते

ओपनएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सॅम ऑल्टमन यांनी गेल्या वर्षी भारताला भेट दिली होती. भारताच्या भेटीदरम्यान ते म्हणाले होते की, भारतासारख्या देशांनी एआय संशोधनाला पाठिंबा द्यायला हवा. त्यामुळे आरोग्य सेवेसारख्या सरकारी सेवांमध्ये सुधारणा होऊ शकते.

सॅम ओल्टमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली

या भेटीदरम्यान सॅम ऑल्टमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. ओपनएआयची जनरेटिव्ह-एआय सेवा चॅटजीपीटी स्वीकारणारा भारत हा पहिला देश आहे, असेही सॅम ऑल्टमन म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 4th Test: शुबमन गिल खऱ्या अर्थानं ठरतोय प्रिन्स? 'हा' पराक्रम करणारा पहिलाच आशियाई; विराटचाही विक्रम मोडला

NASA layoffs: आता ‘नासा’मध्येही मोठी कर्मचारी कपात; ‘ट्रम्प कार्ड’चा फटका!

ENG vs IND, 4th Test: राहुल - गिलची शतकाकडे वाटचाल, तरी इंग्लंडकडे चौथ्या दिवसअखेर मोठी आघाडी; पाचवा दिवस निर्णायक

Harshwardhan Sapkal : सरकार व पालकमंत्री झोपा काढत होते का?

Ajit Pawar: ''मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येतेय! 'राष्ट्रवादी'ने मराठ्यांचा फक्त वापर केला'', अजित पवारांच्या आमदाराकडून घरचा आहेर

SCROLL FOR NEXT