Call Drops Causes and Solutions esakal
विज्ञान-तंत्र

Call Drop : फुल नेटवर्क असतानाही बोलता बोलता कॉल होतोय कट? ही आहे कॉल ड्रॉपची समस्या; कशी कराल दूर,जाणून घ्या

Mobile Tips : फोनवर महत्वाच्या गप्पा मारताना अचानक कॉल कट झाला तर किती चिडचिड होते ना? कॉल ड्रॉप अनेकांना त्रास देतात.

Saisimran Ghashi

Technology : फोनवर महत्वाच्या गप्पा मारताना अचानक कॉल कट झाला तर किती चिडचिड होते ना? कॉल ड्रॉप अनेकांना त्रास देतात. कॉल करताना अचानक कनेक्शन तुटले किंवा फोन बंद पडल्याचा अनुभव सर्वांनाच आला आहे. कॉल ड्रॉप ही समस्या सिग्नल नसलेल्या ठिकाणी तर होणारच पण घरी किंवा ऑफिसमध्येही कधी कधी असा त्रास होतो. यामागे अनेक कारणं असू शकतात, तर काही प्रमुख कारणांवर आणि त्यांच्यावर मात करण्याच्या उपयांबद्दलची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

कॉल ड्रॉपच्या अनेक कारणं असू शकतात पण काही महत्वाची कारणं पाहूया...

कमकुवत सिग्नल - कॉल ड्रॉपची सर्वात महत्वाची कारणं म्हणजे कमजोर सिग्नल किंवा सिग्नलमध्ये चढउतार. मोबाईलवर किती बार आहेत यावरुन आपण अंदाज लावतो पण नेटवर्क कंपन्यांचा यावर एक ठराविक नियम नाही. त्यामुळे कमी बार असले तरी कॉल अगदी चांगला सुरू राहीलही शक्य आहे.

सॉफ्टवेअरमध्ये गडबड - कधी कधी फोनमध्ये सॉफ्टवेअर अपडेट केल्यामुळे ही अडचण येऊ शकते. काही फोनमध्ये असे झालेलं आहे.

नेटवर्क कोंडी - आपण ज्या भागात राहतात तो जास्ती लोकवस्तीचा असेल तर जास्त वापरामुळे कॉल ड्रॉप होऊ शकतात.

कॉल ड्रॉप टाळण्यासाठी काय करावे?

  • वेगळ्या नेटवर्कवर स्विच करा - घरी किंवा ऑफिसमध्ये सिग्नल चांगला नसल्यास दुसऱ्या नेटवर्कवर ट्राय करा. पण नेटवर्क बदलण्याआधी त्यांचे प्लॅन्स आणि इतर ग्राहकांचा अनुभव जरूर तपासा. काही नेटवर्क कंपन्या आपल्या नेटवर्कची माहिती देणारा नकाशा उपलब्ध करुन देतात.

  • फोन अपडेट करा - सॉफ्टवेअर अपडेटमुळे ही समस्या येऊ शकते. त्यामुळे तुमच्या फोनमध्ये लेटेस्ट अपडेट आहे ना ते तपासा.

  • फोन रिस्टार्ट करा - फोन बंद करुन पुन्हा सुरु करणे अनेकदा उपयुक्त ठरते.

  • वाय-फाय कॉलिंग बंद करा - कमी सिग्नल असताना फोन वाय-फायवरुन कॉल करतो. पण कधी कधी यामुळेही कॉल ड्रॉप होऊ शकतात. त्यामुळे वाय-फाय कॉलिंग बंद करुन पाहा.

  • नेटवर्क सेटिंग्स रिसेट करा - अखेरचा पर्याय म्हणजे नेटवर्क सेटिंग्स रिसेट करणे. यामुळे जतन केलेले वाय-फाय आणि ब्लूटुथ डिव्हाइसची माहिती डिलीट होईल याचे लक्षात ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs RCB WPL: 0,0,0,0,0,0,0,0,0,0,1,0! १२ चेंडूंत ११ निर्धाव! lauren bell ने दिला मुंबई इंडियन्सला जबर धाव; विकेटही घेतली अन्...

Pune News : एआय आणि डेटाच्या बळावर महाराष्ट्र होणार 'इनोव्हेशन हब'; डॉ. श्रीकांत पाटील यांनी मांडला रोडमॅप!

Latest Marathi News Live Update : भाजपचं हिंदुत्व हे चुनावी हिंदुत्व आहे का? - उद्धव ठाकरेंचा सवाल

Ayodhya Non-veg Ban: मोठी बातमी! अयोध्येत मांसाहारी पदार्थांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी; उल्लंघन केल्यास..., का निर्णय घेतला?

Chandrapur Kidney Racket Case : ''निवडणुकीच्या कामाच्या व्यस्त असल्याने भेटीला येऊ शकलो नाही'', किडनी पीडितांना भेटताच पालकमंत्र्यांचं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT