Job Scam eSakal
विज्ञान-तंत्र

Job Scam : १५० रुपये मिळवून देत जिंकला विश्वास, थोड्याच दिवसात घातला ४० लाखांना गंडा; या 'जॉब ऑफर' पासून रहा सावध!

यूट्यूब व्हिडिओ लाईक करून, आणि चॅनल सबस्क्राईब करून पैसे कमावण्याची ही ऑफर होती.

Sudesh

देशातील कित्येक तरुण सध्या नोकरीच्या शोधात आहेत. यातच, जर समोरून वर्क फ्रॉम होमची ऑफर आली, तर त्याला नाही म्हणणं बहुतांश जणांना शक्य होत नाही. मात्र, अशा प्रकारची ऑफर देऊन तरुणांना फसवण्याचं प्रमाण यामुळे वाढत आहे. एका व्यक्तीला अशाच स्कॅममध्ये तब्बल ४० लाखांचं नुकसान झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण 3D डिझायनर आहे. त्याला व्हॉट्सअ‍ॅप मेसेजच्या माध्यमातून वर्क फ्रॉम होमची एक ऑफर आली. यामध्ये त्याला केवळ यूट्यूब व्हिडिओ लाईक करून, आणि चॅनल्सना सबस्क्राईब करून त्याचा स्क्रीनशॉट पुढे द्यायचा होता. एका तासामध्ये तीन चॅनल सबस्क्राईब करायचे होते, ज्याचे त्याला ५० रुपये मिळणार होते.

सुरुवातीला या व्यक्तीला कामासाठी १५० रुपये मोबदला मिळाला. त्यानंतर त्याला एका टेलिग्राम ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्यात आलं. या ग्रुपमध्ये आधीपासून १६६ लोक उपस्थित होते. त्यानंतर पुढील काही दिवस कामासाठी या व्यक्तीला १,९०० रुपये, २,०५० रुपये अशी रक्कम मिळत गेली. यामुळे या व्यक्तीचा कंपनीवर विश्वास बसला. (Crime News)

या दरम्यान या व्यक्तीला काही तरुणींनी कॉल करत आणखी पैसे कमावण्याच्या काही ट्रिक्स सांगितल्या. जान्हवी सिंह, मोना, रोझॅना, लकी अशी या महिलांची नावं होती. स्वतःची वेबसाईट तयार केल्यास आणखी कमाई होऊ शकते, असं त्यांनी या व्यक्तीला सांगितलं. तसेच, यासाठी आणखी पैसे गुंतवावे लागतील असंही त्यांनी सांगितलं.

आधीच विश्वास बसल्यामुळे, तसंच आणखी पैसे कमावण्याच्या आशेने या व्यक्तीने आणखी पैसे गुंतवले. त्यानंतर त्याला आणखी एका टेलिग्राम ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्यात आलं. अशाच प्रकारे पैसे गुंतवत या व्यक्तीने जवळपास ४० लाख रुपये या कंपनीत भरले.

त्यानंतर आपल्या अकाउंटमध्ये जमा झालेली कमाईची रक्कम जेव्हा काढून घेण्याचा प्रयत्न या व्यक्तीने केला, तेव्हा त्याचं अकाउंट ब्लॉक झाल्याचं त्याच्या लक्षात आलं. तसंच, स्कॅमर्सनी या व्यक्तीला टॅक्सच्या नावाने ब्लॅकमेल देखील करण्यास चालू केलं. यानंतर आपली फसवणूक झाल्याचं या व्यक्तीच्या लक्षात आलं.

खबरदारी गरजेची

अशा प्रकारचे स्कॅम होण्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारची संदिग्ध ऑफर देणारा मेसेज आल्यास, त्वरीत तो नंबर ब्लॉक करावा. यूट्यूब व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करण्यासाठी कोणतीही कंपनी लाखो रुपये देत नाही, त्यामुळे अशा प्रकारच्या आमिषाला कृपया बळी पडू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर काय होती राज ठाकरेंची प्रतिक्रिया? अमित ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करत सगळंच सांगितलं...

Pune Youth Murder in College Campus : पुण्यात खळबळ!, सिंहगड कॉलेज परिसरात भरदिवसा तरूणाची कोयत्याने वार करून हत्या

Sheikh Hasina: शेख हसीना यांना फाशीची शिक्षा; भारत आता त्यांना परत बांगलादेशात पाठवणार का? जाणून घ्या नियम...

Latest Marathi Breaking News:आदित्य ठाकरेंनी ट्विट करत केलं अमित ठाकरेंचं समर्थन

Kolhapur News: गोकुळच्या लिंगनूर कार्यक्रमात ‘लाडकी बहीण’ वरुन रंगले कलगीतुरे

SCROLL FOR NEXT