World UFO Day 2024 esakal
विज्ञान-तंत्र

World UFO Day : कोई मिल गया मधला जादू आठवतोय? त्याच्या अस्तित्व शोधाचा दिवस; जाणून घ्या कसा साजरा केला जातो हा स्पेशल डे

Space Special : दरवर्षी २ जुलैला जागतिक युएफओ दिन साजरा केला जातो.

Saisimran Ghashi

Aliens : जगाच्या बाहेरही कोणीतरी बुद्धीमान सजीव असतील तर? या प्रश्नांवर शास्त्र अजून उत्तर देऊ शकले नाही पण युएफओच्या (अनोळखी उडणारी वस्तू) अनेक पुराव्यांमुळे या शक्यतेवर चर्चा सुरूच असते. दरवर्षी २ जुलैला जागतिक युएफओ दिन साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश्य म्हणजे अज्ञात उडणारी वस्तू (Unidentified flying object) आणि आपल्या पृथ्वीच्या बाहेर सजीव असण्याची शक्यता यांच्याबाबत जागरूकता निर्माण करणे होय.

युएफओ डेची ऐतिहासिक पार्श्वभूमी १९५० च्या दशकाच्या सुरुवातीला जाते जेव्हा युएफओच्या अनेक वेळा आढळल्यामुळे त्याकडे लोकांचे लक्ष वेधले गेले. १९५२ मध्ये वॉशिंग्टन डीसीच्या आकाशात झालेल्या काही विचित्र युएफोंची चर्चा चांगली रंगली होती. या वाढत्या कुतुहलामुळेच हवाई दिसणार्‍या अज्ञात गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी संस्थांची स्थापना झाली. जसजसा वेळ जात गेला तसे युएफओ विषयी आकर्षण वाढत गेले आणि जगभरातून अनेक घटनांची नोंद झाली.

२००१ मध्ये युएफओ उत्साही लोकांच्या एका गटाने या गूढ घटनांचे स्मरण करण्यासाठी एक विशेष दिन साजरा करण्याची मागणी केली. त्यांनी या दिवसासाठी २ जुलै ही सर्वोत्तम तारीख निश्चित केली. ही तारीख १९४७ मध्ये झालेल्या प्रसिद्ध रोजवेल घटनेच्या वर्धापनदिनाशी सुसंगत आहे. या घटनेत एका युएफओचे अवशेष सापडल्याची अफवा पसरली होती आणि आजही या घटनेबाबत तर्कवितर्क सुरू आहेत.

युएफओ डे विशेषत: युएफोंमध्ये रस असलेल्या आणि त्यांच्या अस्तित्वाच्या या गूढ भागाबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असलेल्या लोकांसाठी महत्त्वाचा आहे. हा दिवस युएफओ बद्दलच्या संशोधनाला चालना देतो आणि या विषयावर उघड आणि चांगली चर्चा घडवून आणतो. तसेच युएफोंशी संबंधित अफवा आणि चुकीच्या समजुती दूर करण्याचा प्रयत्न करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : मराठी संघटना आज पोलिस उपायुक्तांची भेट घेणार

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT