AI Software Engineer
AI Software Engineer eSakal
विज्ञान-तंत्र

AI Software Engineer : ज्यांनी बनवलं त्यांचीच नोकरी खायला लागलं आर्टिफिशिअल इंटेलिजन्स; आता आला एआय-सॉफ्टवेअर इंजिनिअर

Sudesh

US Firm creates first AI Software Engineer : सध्या सर्वच क्षेत्रात एआयचा प्रभाव पडला आहे. जनरेटिव्ह एआयमुळे आपल्या नोकऱ्या धोक्यात आहेत अशी भीती कित्येक क्षेत्रातील लोकांना आहे. मात्र आता चक्क ज्या लोकांनी एआय सॉफ्टवेअर तयार केले आहेत त्याच लोकांच्या नोकऱ्याही धोक्यात आल्या आहेत.

अमेरिकेतील कॉग्निशन (Cognition) या एआय स्टार्टअपने जगातील पहिला एआय सॉफ्टवेअर इंजिनिअर तयार केल्याचा दावा केला आहे. डेव्हिन (Devin) असं या इंजिनिअरचं नाव आहे. कोड लिहिणे, डीबगिंग करणे, वेबसाईट तयार करणे तसंच व्हिडिओंना कोड लागू करणे अशी कित्येक कामं डेव्हिन करू शकतो.

कॉग्निशनने एका एक्स पोस्टमध्ये या इंजिनिअरबाबत सांगितलं आहे. सोबतच त्यांनी डेव्हिनचा काम करताना व्हिडिओही शेअर केला आहे. यामुळे अर्थातच जगभरातील टेक कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढलं आहे. सध्या एआय तंत्रज्ञान जास्त प्रगत नसताना देखील कित्येक कंपन्या कर्मचाऱ्यांऐवजी एआयला प्राधान्य देत आहे. हे तंत्रज्ञान विकसित झाल्यानंतर कंपन्या आणखी नोकरकपात करतील अशी भीती व्यक्त केली जात आहे.

डेव्हिनने आतापर्यंत कित्येक प्रात्यक्षिक इंजिनिअरिंग मुलाखती आणि प्रोजेक्ट पूर्ण केले आहेत. "डेव्हिन हा स्वतःच विचार करून इंजिनिअरिंग टास्क पूर्ण करू शकतो. यासाठी तो स्वतःचं शेल, कोड एडिटर आणि वेब ब्राऊजरची मदत घेतो. डेव्हिनने आतापर्यंत गिटहबवरील 13.86 टक्के प्रश्न कोणाच्याही मदतीशिवाय सोडवले आहेत. सध्या उपलब्ध असणाऱ्या कोणत्याही एआय मॉडेलपेक्षा अधिक चांगलं काम तो करू शकतो" अशी माहिती कॉग्निशन कंपनीने दिली आहे.

सॉफ्टवेअर इंजिनिअर्स कोड डेव्हलप करणे, सॉफ्टवेअरला लागू करणे, डीबगिंग करणे अशी कित्येक कामं शिकण्यासाठी कॉलेजमधील तीन ते चार वर्षं घालवतात. कितीतरी कंपन्यांमध्ये या वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या टीम्स किंवा कर्मचारी असतात. एकच एआय सॉफ्टवेअर जर काही मिनिटांमध्ये ही सगळी कामं करत असेल, तर ही सध्या काम करणाऱ्या आणि भविष्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच धोक्याची घंटा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

Latest Marathi Live News Update: संसदेची सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आजपासून CISF कडं!

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT