Redmi 13 5G India Launch Price Features esakal
विज्ञान-तंत्र

Redmi Smartphone Launch : रेडमिचा बहुचर्चित 5G मोबाईल झाला लाँच,लगेच घ्यावा वाटेल असे जबरदस्त फीचर्स अन् एकदम कमी किंमत

Smartphone Tips : टेक क्षेत्रातील आघाडीची कंपनी Xiaomi ने भारतात त्यांचा बहुचर्चित Redmi 13 5G स्मार्टफोन लाँच केला आहे.

Saisimran Ghashi

Mobile Buying Tips : टेक क्षेत्रातील आघाडीची कंपनी Xiaomi ने भारतात त्यांचा बहुचर्चित Redmi 13 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनची सुरुवातीची किंमत फक्त रु. 13,999 इतकी आहे. 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला हा बेस व्हेरियंट आहे. कंपनी दोन व्हेरियंट्स आणि तीन आकर्षक रंगांमध्ये हा फोन उपलब्ध करत आहे. पहिल्या विक्री दरम्यान रु. 1,000 ची अतिरिक्त सूट देखील मिळणार आहे.

Redmi 12 5G च्या यशस्वी परंपरेवर पुढे जात, Redmi 13 5G 120Hz रिफ्रेश रेट असलेला 6.79 इंचाचा मोठा डिस्प्ले आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास बॅक पॅनलसह आला आहे. स्नॅपड्रॅगन 4 Gen 2 AE चिप आणि कंपनीचं नवीनतम हायपरओएस यावर चालणारा हा फोन रु. 15,000 पेक्षा कमी बजेटमध्ये दमदार पर्फॉर्मन्स देणारा आहे.

किंमत आणि उपलब्धता

रेडमी 13 5G ची सुरवात किंमत रु. 13,999 आहे. दोन व्हेरियंट्समध्ये उपलब्ध असलेल्या या फोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज किंवा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज पर्याय आहेत. ओशन ब्लू, पर्ल पिंक आणि मिडनाइट ब्लॅक अशा तीन आकर्षक रंगांमध्ये हा फोन खरेदी करता येईल.

मुख्य वैशिष्ट्ये

रेडमी 13 5G मध्ये आधीच्या प्रमाणेच ग्लास कवर आहे. मात्र यावेळी मागच्या बाजूला वेगळ्या डिझाईनसाठी एलईडी रिंग लाईटसह ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आलं आहे. मोठ्या 6.79 इंचाच्या डिस्प्लेसोबत 120Hz रिफ्रेश रेटचा अनुभव मिळतो. यात पंच-होल नॉच डिझाईन आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन आहे.

प्रोसेसरबद्दल बोलायचं झालं तर, Redmi 13 5G मध्ये स्नॅपड्रॅगन 4 Gen 2 AE चिप आहे. Redmi 12 5G मध्ये देखील हाच चिप वापरण्यात आला होता. मात्र, Redmi 13 5G मध्ये नवीन हायपरओएस देऊन वापरकर्त्यांना वेगळा अनुभव देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. 5030mAh ची दमदार बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. फोटोग्राफीसाठी 108 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आहे. सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara : महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी अंबादास दानवेंचे गंभीर आरोप, थेट भाजपच्या माजी खासदाराचं नाव घेतलं

Ishwarpura News : बाळासाहेब ठाकरेंची अखेर इच्छा पूर्ण, इस्लामपूरचे झाले ‘ईश्वरपूर’; सर्व दस्ताऐवजांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : दिवाळी संपली! भिडे पूल पुणेकरांसाठी बंद

AUS vs IND 3rd ODI: भारताचे गोलंदाज चमकले, ऑस्ट्रेलियाला अडीचशेच्या आत रोखले; आता व्हाईटवॉश टाळण्याचं लक्ष्य

Jaykumar Gore : '...तर पंतप्रधान मोदींसोबत चहा पिण्याची संधी मिळणार'; मंत्री जयकुमार गोरेंनी सांगितलं 'हे' खास कारण

SCROLL FOR NEXT