Xiaomi SU7 eSakal
विज्ञान-तंत्र

Xiaomi SU7 : टेस्लाचं दुकान होणार बंद? श्याओमीने स्वस्तात लाँच केली 700 किलोमीटर रेंजची इलेक्ट्रिक कार; किंमत फक्त..

Xiaomi Super Ultra 7 : श्याओमीच्या या कारचे तीन व्हेरियंट लाँच करण्यात आले आहेत. यातील बेस व्हेरियंटची रेंज सुमारे 700 किलोमीटर असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Sudesh

Xiaomi Electric Car Price : काही दिवसांपूर्वी मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये श्याओमीने आपली बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक कार सादर केली होती. Xiaomi SU7 असं नाव असलेल्या या कारने संपूर्ण कार्यक्रमावर आपली छाप सोडली होती. ही कार कधी लाँच होते आणि तिची किंमत किती असेल याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागून होती. अखेर कंपनीने चीनमध्ये ही कार लाँच केली आहे.

किती आहे किंमत?

श्याओमीच्या या कारचे तीन व्हेरियंट लाँच करण्यात आले आहेत. यातील पहिल्या व्हेरियंटमध्ये 73.6 kWh बॅटरी देण्यात आली आहे. या व्हेरियंटची रेंज सुमारे 700 किलोमीटर असल्याचा दावा कंपनीने केला आहे. याची किंमत 2,15,900 चिनी युआन (सुमारे 25 लाख रुपये) एवढी आहे. (Xiaomi SU7 Price)

या कारचं दुसरं व्हेरियंट (Xiaomi SU7 Pro) तब्बल 830 किलोमीटरची रेंज देते असा दावा कंपनीने केला आहे. यामध्ये 94.3kWh बॅटरी देण्यात आली आहे. याची किंमत 2,45,900 युआन (सुमारे 28.5 लाख रुपये) एवढी आहे. तर याच्या टॉप मॉडेलमध्ये (Xiaomi SU7 Max) 101kWh बॅटरी देण्यात आली आहे. याची रेंज तब्बल 900 किलोमीटर असल्याचा दावा कंपनीने केला आहे. याची किंमत 2,99,900 युआन (सुमारे 35 लाख रुपये) एवढी आहे.

टेस्लाला देणार टक्कर

कंपनीने जाहीर केलेल्या किंमती या चीनमधील आहेत. कंपनीने अद्याप भारतातील लाँच डेट किंवा भारतातील किंमती अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. काही दिवसांपूर्वीच टेस्लाला भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला होता. टेस्लाने देखील भारतात स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच करण्याची योजना आखली आहे. यातच श्याओमीला देखील भारतात कार लाँच करण्याची परवानगी मिळाली, तर दोन्ही कंपन्यांमध्ये चांगलीच टक्कर पहायला मिळेल. (Xiaomi Electric Car)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Pune Crime : ‘एपीआय’ला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

Maharashtra Rain Alert : मुंबईत दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरुच, रायगड, पालघरमध्ये शाळांना सुट्टी; रेड अलर्ट जारी, पुढील ४ दिवस धोक्याचे

Shriram Rajurkar Passes Away : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीराम पाटील राजुरकर यांचे निधन; नांदेडच्या ग्रामीण राजकारणातील एक संयमी, विकासाभिमुख नेतृत्व हरपले

पोलिस उपायुक्तांचे आदेश! ट्रॅफिक पोलिस नेमलेल्या ठिकाणीच असणे बंधनकारक; ‘HSRP’ नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर ‘आरटीओ’ करणार कारवाई; रिक्षा चालकांना ड्रेसकोडचे बंधन

SCROLL FOR NEXT