yamaha rx100 bike may return soon check details
yamaha rx100 bike may return soon check details  
विज्ञान-तंत्र

अनेकांचे अधुरे स्वप्न होणार पूर्ण; Yamaha RX100 चा आवाज पुन्हा घुमणार

सकाळ डिजिटल टीम

New Yamaha RX100 : भारतीय बाजारपेठीतील आतापर्यंतची सर्वात आयकॉनिक समजली जाणीरी दुचाकी Yamaha RX100 पुन्हा परत येतेय . आजही या बाइकचे चाहते सर्व वयोगटातील आहेत. ही बाइक भारतात पुन्हा लॉन्च होण्याच्या तयारीत आहे.

नुकतेच समोर आलेल्या माहितीनुसार यामाहा मोटर इंडियाचे चेअरमन इशिन शीहाना यांनी सांगितले की, येणा-या काळात यामाहा RX100 नवीन अवतारात (Yamaha RX100) सादर केला जाऊ शकते. असे मानले जाते की काही कॉस्मेटिक बदल आणि नवीन इंजिनसह, लाखो लोकांची आवडती 100 सीसी बाईक, Yamaha RX100 पुढील काही वर्षांत भारतीय रस्त्यावर पुन्हा धावताना दिसेल.

2026 पर्यंत लॉन्च होऊ शकते...

मीडिया रिपोर्ट्सनुसार यामाहाची आयकॉनिक बाईक भारतात पुन्हा लॉन्च केली जाऊ शकते (Yamaha RX100 Re-Launch In India). यानंतर अनेक चाहत्यांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

यामाहा मोटर इंडियाचे चेअरमन म्हणाले की, आम्ही RX100 परत आणू इच्छितो, ज्यामध्ये BS6 इंजिन असू शकते.दमदार स्टाईल आणि फीचर्ससह ती सादर करणे हे एक मोठे आव्हान आहे, जे शक्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कदाचित ती 2026 पर्यंत इतर काही नेमप्लेटसह लॉन्च केली जाऊ शकते.

Yamaha RX100 भारतात 1985 मध्ये लॉन्च करण्यात आला होती आणि 1996 पर्यंत त्याचे उत्पादन करण्यात आले. यानंतर या आयकॉनिक मोटरसायकलची भारतात विक्री थांबली. गाव-खेडी ते मोठी शहरे सर्व वयोगटातील लोकांमध्ये ही बाइक खूप लोकप्रिय होती. आजही हजारो लोक ही गाडी छंद म्हणून जपतात. Yamaha RX100 चित्रपटांमध्येही झळकली आहे.

ही बाईक येत्या काळात लाँच करता आली तर 100 सीसी सेगमेंटमधील सर्वाधिक विक्री होणाऱ्या हिरो स्प्लेंडरच्या विक्रीवर नक्कीच परिणाम होऊ शकतो. Yamaha RX100 चे भारतात आगमनाने लाखो लोकांसाठी एक सुंदर स्वप्न पूर्ण होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 06 मे 2024

Women’s T20 World Cup: स्कॉटलँडने रचला इतिहास, वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच मिळवलं तिकीट; श्रीलंकाही ठरले पात्र

Sharad Pawar : बारामतीकरांना धक्का अशक्य;निवडणुकीची अमेरिकेतही उत्सुकता

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

SCROLL FOR NEXT