Yezdi Bike esakal
विज्ञान-तंत्र

Yezdi Bike : आता हवा करणार तांबडी येझडी, महिंद्रा सुद्धा पडले प्रेमात

काही दिवसांपूर्वी जावाच्या तीन बाईक बाजारात आल्यानंतर आता येझडी ही लॉन्च होणार

सकाळ डिजिटल टीम

Yezdi Bike : काही दिवसांपूर्वी जावाच्या तीन बाईक बाजारात आल्यानंतर आता येझडी ही लॉन्च होणार असल्याच्या चर्चा होत्या. ८० आणि ९० च्या दशकात धुमाकूळ घालणाऱ्या बीएसए आणि येझडी लवकरच भारतीय बाजारात आल्या आहेत.

जावा येझडी मोटरसायकलने नुकतीच येझडी रोडस्टर ही लोकप्रिय बाईक एका नवीन रंगाच्या ऑप्शनसह बाजारात लाँच केली आहे. महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी ट्विट करून बाइकच्या नवीन कलर व्हेरियंटची माहिती दिली आहे. कंपनीने ही आलिशान बाईक क्रिमसन रेड ड्युअल टोनमध्ये सादर केली आहे. आनंद महिंद्रा यांनी याला रेड हॉट असं नाव दिलंय.

येझडी बाईकच्या क्रिमसन रेड ड्युअल टोन कलर व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 2.03 लाख रुपये आहे. ही बाईक ग्लॉस फिनिशिंगसह ड्युअल टोन शेडमध्ये लाँच करण्यात आली आहे. त्यामध्ये पांढरा आणि किरमिजी रंगाचा लाल रंगाचा शेड आहे. नवीन पेंट स्कीममुळे या बाइकला एक आकर्षक लुक मिळतोय.

कंपनीने म्हटलंय की, सर्व-नवीन येझडी रेंज इंडीयन मार्केटमध्ये लाँच करण्यात आली आहे. वेगवेगळ्या प्रदेशानुसार बाइक्स सादर करण्यात आल्या असून डीलरशिप नेटवर्क पूर्वीपेक्षा अधिक वेगाने विस्तारत आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही फक्त सुरुवात आहे आणि कंपनी येत्या काही वर्षांत यात नवे मॉडीफिकेशन करणार आहे.

येझदी रोडस्टरच्या परफॉर्मन्स बद्दल बोलायचं झाल्यास, ही बाईक 334cc सिंगल सिलेंडर इंजिनच्या पॉवरसह येते. यात 29bhp आणि 28.95 Nm चा पीक टॉर्क जनरेट दिलाय. पॉवर ट्रान्समिशनसाठी या बाइकमध्ये 6 स्पीड गिअरबॉक्सचा पर्याय देण्यात आलाय.

या मोटरसायकलच्या फीचर्स बद्दल सांगायचं तर, यात असिस्ट आणि स्लिपर क्लच देण्यात आलात. ही बाईक डिस्क ब्रेक आणि ड्युअल-चॅनल ABS सह येते. सस्पेंशन ड्युटीसाठी, याला टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस ड्युअल शॉकऑब्जर दिलेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: सत्तेचा काटा फिरवणार! काँग्रेस–वंचितची आघाडी कुणाचं गणित बिघडवणार? मुंबईची राजकीय सत्तासमीकरणं हादरली

Daulatabad News : वेरूळ, देवगिरी परिसर ‘हाउसफुल्ल’; घाटात वाहनांच्या रांगा; सलग सुट्यांचा परिणाम

Vastu Shastra: आठवड्याच्या 'या' दिवसांत पैशाचे व्यवहार करू नका, वास्तुशास्त्रात सांगितले महत्त्वाचे नियम

Horoscope : 2026 वर्ष सुरू होताच बनतोय लक्ष्मी-कुबेर धनलाभ योग; 6 राशींच्या लोकांना मिळणार भरपूर पैसा, अडकलेली कामे होणार पूर्ण

Latest Marathi News Live Update : राज ठाकरेंना पश्चाताप होईल, असे जागावाटप, उदय सामंतांची टीका

SCROLL FOR NEXT