YouTube
YouTube  YouTube
विज्ञान-तंत्र

YouTube चे नवीन लाइव्ह रिंग फीचर, मिळेल Tiktok सारखा अनुभव

सकाळ डिजिटल टीम

लॉकडाऊनच्या काळात YouTube वर लाइव्ह स्टीमिंग करण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. दरम्यान व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube ने वापरकर्त्यांसाठी नवीन लाइव्ह रिंग (Live Ring) फीचर सादर केले आहे. या फीचरमध्ये मध्ये एक लाल रंगाची रिंग असेल, जी YouTube चॅनल लाइव्ह स्ट्रीम करताना वापरककर्त्यांना उपयोगी ठरणार आहे. यामुळे लाईव्ह असलेली चॅनेल सहजपणे ओळखता येणार आहेत. हे फीचर हुबेहूब टिकटॉक सारखे असेल, जे चॅनलच्या प्रोफाइलभोवती एक वलय तयार करेल. यातील काही फीचर ट्विटर स्पेसमध्ये देखील देण्यात आले आहेत.

फायदा काय होईल

YouTube चे मुख्य प्रॉडक्ट अधिकारी नील मोहन यांनी ट्विट केले की, युजर्सना @Youtube चे लाइव्ह स्ट्रीमिंग चॅनल शोधणे सोपे व्हावे यासाठी YouTube चा प्रयत्न आहे. यासाठी, जेव्हा YouTube क्रिएटर्स लाइव्ह स्ट्रीमिंग करत असतील, तेव्हा त्यांच्या चॅनलभोवती एक लाल वर्तुळ तयार केले जाईल, त्यावर क्लिक केल्यानंतर ते थेट लाइव्ह स्ट्रीमिंगशी जोडले जातील. इन्स्टाग्राममध्येही असेच फीचर देण्यात आले आहे. ज्यामध्ये लाईव्ह स्ट्रिमिंग दरम्यान प्रोफाइल पिक्चरभोवती एक गोल रिंग तयार होते.

मोहन यांनी घोषणा केली आहे की कंपनी 2022 मध्ये शॉर्ट व्हिडिओ, लाइव्ह व्हिडिओ आणि व्हिडिओ ऑन डिमांड (VOD) मध्ये अधिकाधिक गुंतवणूक करेल. यासोबतच कंपनी मॉनिटायजेशन ऑप्शन्सवर देखील काम करेल. त्यांनी सांगितले की लाइव्ह हा एक वेगळा सेक्शन आहे, ज्यामध्ये यावर्षी खूप वाढ नोंदवली गेली आहे. जानेवारी 2020 आणि डिसेंबर 2021 मध्ये दैनिक लाइव्ह वॉचची वेळ तीन पटीने वाढली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Collection: जीएसटीने रचला इतिहास! पहिल्यांदाच कलेक्शन 2 लाख कोटींच्या पुढे; सरकार मालामाल

Latest Marathi News Live Update: विदर्भ राज्य पार्टीच्या वतीने आज महाराष्ट्र दिवस हा काळा दिवस म्हणून पाळला जात आहे

Bahubali: Crown Of Blood : "बाहुबली परत येतोय" ; एसएस राजामौली यांनी केली नव्या सिरीजची घोषणा

T20 World Cup 2024 All Teams Squad : भारत, पाकिस्तान, इंग्लंडसह सर्व 20 संघांचा 'स्क्वाड'! जाणून घ्या फक्त एका क्लिकवर

Satara Lok Sabha : 'साताऱ्याचा खासदार शशिकांत शिंदेच होणार, ही काळ्या दगडावरची रेघ'; जयंत पाटलांना विश्वास

SCROLL FOR NEXT