Technical Glitch Removes Thumbs Up Icon on YouTube Like Button esakal
विज्ञान-तंत्र

Youtube Glitch: तुमच्या पण युट्युबवरचं लाईक बटन होऊ शकतं गायब; वापरकर्ते अन युट्युबर्स झालेत हैराण,जाणून घ्या काय आहे प्रकरण

Youtube Like Button Error: यूट्यूब कंपनीच्या स्पष्टीकरणाने वापरकर्ते नाराज

Saisimran Ghashi

Youtube Thumb Button : युट्युबवर व्हिडिओ बघताना तुम्हाला like करायचा असेल तर थोडा अडचणीचा सामना करावा लागू शकेल. कारण अनेक युट्युब वापरकर्तांना लाईक बटनावरचा थम्स अप बटन दिसत नाहीये अशी समस्या येत आहे.

वापरकर्त्यांनी दोन समस्यांची तक्रार केली आहे. पहिली म्हणजे, "लाईक बटनावर थम्स अप दिसत नाही" आणि दुसरी म्हणजे, "व्हिडिओ लाईक केल्यानंतर थम्स अप बटन गायब होते." काही वेळा लाईक केल्यावर रिक्त "Reaction!" असे दिसून येते.

असं वाटतंय की लाईक बटन अजूनही व्हिडिओवर लाईक रेकॉर्ड करण्यासाठी कार्य करत आहे. परंतु, तुम्ही त्यावर टॅप केल्यानंतर ते तुम्हाला रिक्त जागा दाखवू शकेल. या glitchबद्दल विचारले असता, "चिन्ह दिसत असो वा नसो, व्हिडिओला अजूनही लाईक मिळत आहे!", असे यूट्यूबने स्पष्टीकरण दिले आहे.

या तांत्रिक बिघानामुळे युट्युब वापरकर्ते, विशेषतः युट्युबवर कंटेंट तयार करणारे त्रस्त झाले आहेत कारण त्यांना त्यांच्या कंटेंटला किती लोकांनी लाईक केले याचा मागोवा घेता येत नाही. ही समस्या अनेकांना आणि विविध वेब ब्राउझर्सवर आढळली आहे. युट्युबने आश्वासन दिले आहे की, लाईक बटन "जशी अपेक्षित कार्यप्रणाली नाही" त्याप्रमाणे ते या समस्येवर काम करत आहेत.

व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्मने मंगळवारी प्रकाशित केलेल्या support पेजवर या समस्येबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. तथापि, "ही समस्या iba वेबवरील व्हिडिओवर आढळत आहे, मोबाइलवर नाही" असे सांगून त्यांनी या समस्येचे खंडन केले.

समस्या कधी सुटेल याची अद्याप माहिती नाही. परंतु, अपडेट असल्यास ते support पेजवर सूचित करतील, असे यूट्यूबने सांगितले आहे.तरीही अजून लाईकची नोंद होत असली तरी, लाईक केल्यानंतर बटन दिसत नाही ही समस्या कायम आहे. Reddit वापरकर्त्यांना काही महिन्यांपूर्वी देखील अशीच समस्या आली होती, अशी चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT