robot
robot 
विज्ञान-तंत्र

भेटा पहिल्या रोबोट नेत्याला

वृत्तसंस्था

वेलिंग्टन- तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात रोज नवनवे प्रयोग होत असतात. न्यूझीलंडच्या वैज्ञानिकांनी नुकताच एक रोबोट विकसित केला असुन, न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत या रोबोटला चक्क उमेदवार करण्याची तयारी सुरू आहे. राजकारणात पारदर्शकता आणण्यासाठी वैज्ञानिकांनी हा रोबोट नेता तयार केला आहे.  

'सॅम' असे या रोबोट नेत्याचे नाव आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या या सॅमने नुकतेच घर, शिक्षण, व्हिसासंबंधी धोरणे आणि स्थानिक मुद्द्यांवर नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे दिली. 

न्यूझीलंडमधील 49 वर्षीय उद्योगपती निक गॅरिट्सन यांनी 'सॅम'ची निर्मिती केली आहे. जगातील अनेक जेष्ठ नेते जल आणि वायू परिवर्तन किंवा समानता यांसारख्या क्लिष्ट मुद्द्यांवर तोडगा काढू शकत नाहीत. त्यामुळे सॅमसारख्या रोबोट नेत्याची निर्मिती केल्याचे गॅरिट्सन यांनी म्हटले आहे. सध्या हा रोबोट फेसबुक मेसेंजरवर लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देणे शिकत आहे

दरम्यान, 'टेक इन आशिया'ने एका अहवालात दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकारे रोबोट नेता लोकांची मदत करु शकेल का यावर संशोधन सुरु आहे. परंतु, अनेक देशांमध्ये वाढते राजकीय आणि सांस्कृतिक अंतर भरण्यासाठी अशा रोबोट नेत्यांची मदत होऊ शकेल.

सौदीत देखील एक महिन्यापूर्वीच सोफिया या महिला रोबोटला नागरिकत्व देण्यात आले. ती लोकांशी चर्चाही करू शकते. या रोबोटला अरब देशांतील कोणत्याही सामान्य महिलेपेक्षा जास्त अधिकार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; देशपांडेने दुसऱ्याच षटकात दिले दोन धक्के

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT