Deepali-Kailaje
Deepali-Kailaje 
टूरिझम

सोलो ट्रॅव्हलर : नियोजन आणि ‘सिक्स्थ सेन्स’

शिल्पा परांडेकर

नाव -     दीपाली कैलाजे
गाव -     मुंबई
काम -     शिपिंग कंपनीमध्ये उच्च पदावर कार्यरत.

‘जोदी तोरे डाक शूने केऊ ना अशे तोबे एकला चोलो रे...’
रवींद्रनाथांचे हे प्रेरणादायी शब्द प्रत्येक ‘सोलो’साठी आणि प्रत्येक ‘सोलो ट्रॅव्हलर’च्या प्रवासासाठी अगदी चपखल बसतात ना! कोणीतरी प्रवासात एकटीला सोडून जाते किंवा कोणीतरी अचानक ठरलेला प्रवासच रद्द करतो आणि बऱ्याचदा हाच क्षण ठरतो आयुष्याला ‘कलाटणी’ देणारा आणि ‘एकला चोलो’ म्हणणारा...

दीपालीच्या बाबतीतही असेच काहीसे झाले. तिच्या पतीने सहा महिन्यांपूर्वी ठरवलेला ट्रेक शेवटच्या क्षणी रद्द केला. गाइडच्या मदतीने तिने हा पाच दिवसांचा ट्रेक पूर्ण केला. दीपाली सांगते, ‘‘लाकडावर अन्न शिजवणे, एकटीने तंबूत राहणे या गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या. रात्री मला भीती वाटायची, वाऱ्याने तंबूच उडून गेला तर! नक्कीच असे काही झाले नाही, मात्र या ट्रेकनंतर एका गोष्टीची जाणीव झाली, की रोजच्या धावपळीतून, कुटुंबापासून दूर असा ‘मी टाइम’ अर्थात स्वतःला स्वतःसाठी वेळ देणे आवश्यक आहे. यात तुम्ही नेहमीपेक्षा वेगळ्या, तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी कराव्यात.’’ 

थायलंड, नेपाळ, स्वीडन, पॅरिस, इस्राईल आणि जॉर्डन या देशांचा व नीमराना, जयपूर, लडाख, उत्तराखंड व हिमाचल प्रदेश असा प्रवास तिने एकटीने केला आहे. यातील इस्राईल हा त्यांच्या लोकसंस्कृतीमुळे आणि स्वीडन हा त्यांच्या आदरातिथ्यामुळे तिला अपार प्रिय आहे.

‘इस्राईलला जाताना मुंबई विमानतळावर काही कटू प्रसंगांना सामोरे जावे लागले. खूप वाईट वाटले; पण इतकी वर्षं उराशी बाळगलेले स्वप्न असेच कसे सोडून देऊ? परंतु तिकडे पोचल्यावर या कटू प्रसंगाचे मळभ कुठल्या-कुठे दूर झाले. शिवाय, याच प्रवासात मला दोन चांगल्या ‘सोलो ट्रॅव्हलर’ मैत्रिणीही भेटल्या. लवकरच आम्ही मसाई मारा इथे वाइल्ड लाइफ सफरीवर एकत्रित जाणार आहोत,’’ असे दीपाली सांगते. 

दीपालीशी बोलताना एक जाणवलं, की ती तिच्या टूर्सचे खूप बारकाईने नियोजन करते. घरच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडून योग्य त्या प्रकारे टूरचे आर्थिक नियोजन हा त्यातील पहिला आणि महत्त्वाचा टप्पा. प्रवासाच्या ठिकाणाची इत्थंभूत माहिती, विविध ब्लॉग व रिव्ह्यू वाचणे या अजून काही महत्त्वाच्या गोष्टी ती करते. शिवाय, प्रवासात तुमचा ‘सिक्स्थ सेन्स’ जागृत असणे गरजेचे आहे, हे ती आवर्जून सांगते.

आवाहन
तुमचा ‘सोलो’ प्रवासही असाच खास आहे का? आम्हाला तुमच्या सोलो राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय प्रवासाची गोष्ट आणि अनुभव जाणून घ्यायला आवडेल. तुमचे अनुभव ३०० शब्दांत लिहून आम्हाला 
maitrin@esakal.com येथे मेल करा.
निवडक अनुभवांना प्रसिद्धी दिली जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT