Christmas 2023 : अवघ्या काही दिवसांवर ख्रिसमस येऊन ठेपला आहे. त्यामुळे, खास ख्रिसमसचे सेलिब्रेशन करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचे पहायला मिळत आहे. ख्रिसमसचे सेलिब्रेशन करण्यासाठी अनेक जण बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करतात.
या ख्रिसमसला जर तुम्ही देखील बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर आज आम्ही तुम्हाला नॉर्थ ईस्टमधील काही खास ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. या ठिकाणी जाऊन तुम्ही ख्रिसमसचे सेलिब्रेशन करू शकता आणि मनसोक्त आनंद देखील घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊयात या ठिकाणांबद्दल.
नागालॅंड राज्यातील जुन्हेबोटो सुमी बॅपटिस्ट चर्च हे आशिया खंडातील सर्वात मोठे चर्च आहे. हे चर्च नागालॅंड राज्यातील सुंदर खोऱ्यांमध्ये वसलेले आहे. त्यामुळे, हे चर्च आणि येथील नयनरम्य नजारा पाहण्यासारखा असतो.
नागालॅंड राज्यातील जून्हेबोटोमध्ये पर्वतांच्या मधोमध हे चर्च वसले आहे. हे चर्च पाहण्यासाठी देश-विदेशातील लोक येथे गर्दी करतात. ख्रिसमसच्या दरम्यान या चर्चला आकर्षक रोषणाई आणि सजावट केली जाते. त्यामुळे, ख्रिसमस काळात हे चर्च पाहण्यासाठी आणि येथे भेट देण्यासाठी अनेक पर्यटक गर्दी करतात.
या चर्चचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे चर्च बनवण्यासाठी एकूण १० वर्षे लागली. या चर्चचे बांधकाम २००७ मध्ये सुरू करण्यात आले होते.
ख्रिसमसचे सेलिब्रेशन करण्यासाठी जर तुम्हाला उंच पर्वतांमध्ये घनदाट जंगलांमधील परिसरात जायचे असेल तर, मग गंगटोक हे शहर तुमच्यासाठी बेस्ट आहे. गंगटोक, नाथुला, तवांग, नाथूला दर्रा आणि मेचूका घाटी ही येथील पर्यटन स्थळे फिरण्यासाठी सर्वात बेस्ट ऑप्शन्स आहेत.
हे शहर चहूबाजूंनी पर्वतांनी वेढलेले आहे. त्यामुळे, हिवाळ्यात आणि खास करून ख्रिसमसच्या दरम्यान येथील नजारा अतिशय नयनरम्य दिसतो. त्यामुळे, तुम्ही जर ख्रिसमसचे सेलिब्रेशन करण्यासाठी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर गंगटोकचा नक्की विचार करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.