Lohagad Fort, Rajasthan esakal
टूरिझम

Lohagad Fort: प्रसिद्ध लोहगड किल्ल्याचा इतिहास माहिती आहे का? होळकरांनी केलेला इंग्रजांचा पराभव

भारतीय इतिहासात युद्धाला विशेष महत्त्व आहे.

सकाळ डिजिटल टीम

Lohagad Fort: भारतीय इतिहासात युद्धाला विशेष महत्त्व आहे. भारतात अशी अनेक युद्ध होऊन गेली ज्यांनी इतिहास रचला; असंच एक युद्ध म्हणजे जाट-होळकरांनी एकत्र येऊन इंग्रजांविरुद्ध सुमारे 3 महिने लढलेलं युद्ध. या युद्धात इंग्रजांना माघार घेण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. या युद्धाची नोंद द ऑक्सफर्ड हिस्ट्री ऑफ इंडिया या पुस्तकातही झाली आहे.

भारताचा एकमेव अजेय किल्ला म्हणजे लोहगढ; राजस्थानमध्ये भरतपुर मध्ये असलेला हा किल्ला, याची रचना जाट वंशज राजा सुरजमल यांनी केलेली; 1805 मध्ये झालेल्या इंग्रजांविरुद्ध लढलेल्या आणि जिंकलेल्या युद्धामुळे याची ख्याती सर्वदूर पसरली. हे युद्ध होळकर आणि जाट यांनी मिळून लढले होते.   

यशवंतराव होळकर यांचा जन्म 3 डिसेंबर 1776 रोजी महाराष्ट्रातील बाफ गावात झाला.  गादीवर बसल्यानंतर त्यांनी मराठा संघटित करण्याचा प्रयत्न केला, परंतु परस्पर वर्चस्वामुळे त्यांना यश मिळाले नाही. परिणामी, 1802 मध्ये, होळकरांच्या सैन्याने हडपसरच्या मैदानात बाजीराव पेशवे द्वितीय आणि दौलतराव सिंधिया यांच्या संयुक्त सैन्याचा पराभव केला.  

होळकरांनी 8 जुलै 1804 रोजी कोटाजवळ कर्नल मानसनच्या सैन्याचा नाश केला. कोटा येथून मानसनचा पाठलाग करत, होळकरांचे सैन्य फतेहपूर सिक्रीपर्यंत पोहोचले, नंतर रात्रीचा फायदा घेऊन मॅन्सन आग्र्याकडे पळून गेला. तेव्हा होळकरांनी मथुरा काबीज केली. 

इंग्रज सैन्याच्या दबावामुळे होळकरांना मदत लागणार होतीच; त्यांची इंग्रजांचे कट्टर शत्रू महाराजा रणजितसिंग यांच्याशी स्नेहाचे संबंध होते. होळकरांनी राजदूत भास्कर भाऊंना पत्र लिहून भरतपूर महाराजा रणजितसिंग यांना पाठवले. मैत्री आणि देशाच्या संरक्षणासाठी त्यांनी सहकार्य मागितले.

भरतपूरचे महाराजा रणजित सिंह यांनी इंग्रजांशी केलेला करार नाकारला आणि होळकरांचे डीग येथे स्वागत केले. इथे 7 जानेवारी 1805 रोजी भरतपूरच्या मैदानात हे युद्ध सुरू झाले आणि सुमारे 3 महिने चालले. 

यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार करण्यात आला. तोफांचा मारा सुरू झाला आणि लढाई सुरू झाली.  भरतपूरचे मैदान इंग्रज सैनिकांच्या मृतदेहांनी झाकलेले होते. 21 फेब्रुवारीला इंग्रजांनी चौथा प्रयत्न केला, पण यावेळी पुन्हा इंग्रजांचे 3200 सैनिक मारले गेले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारतीय संघ सेमीफायनलमध्ये! न्यूझीलंडचे पराभवासह आव्हान संपलं; स्मृती मानधना-प्रतिका रावल विजयाच्या नायिका

Raireśhwar Fort Incident VIDEO : रायरेश्वर किल्ला परिसरात दारू पार्टी करणाऱ्या परप्रांतीय तरूणांना शिवप्रेमींकडून चोप!

Ambulance Fire : मध्यरात्री लातूरकडे जाताना ॲम्बुलन्स जळून खाक! डॉक्टरांनी दाखवले प्रसंगावधान, महिलेचा जीव वाचला

Lonar News : समृद्धी महामार्गावर मोठी कारवाई! संशयास्पद कंटेनर चालकाजवळ आढळले देशी पिस्तूल व जिवंत काडतुसे

PM Kisan Yojana News: पीएम किसान योजनेच्या २१ व्या हप्त्याबाबत नवीन अपडेट; जाणून घ्या, २००० रुपये कधी येणार?

SCROLL FOR NEXT