Goa Statehood Day 2025 sakal
टूरिझम

Goa Statehood Day 2025: गोवा कसं बनलं भारताचं २५वं राज्य? जाणून घ्या ३० मेचा इतिहास

When Did Goa Become a Full-Fledged State of India: गोवा राज्य दिन म्हणजे गोमंतकीय संघर्ष, स्वातंत्र्य आणि अभिमानाची आठवण जपणारा ऐतिहासिक दिवस.

Anushka Tapshalkar

What is the History Behind Goa's Statehood Day: भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेलं निसर्गरम्य आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आणि भारतातील सर्वात छोटं राज्य म्हणजे गोवा. दरवर्षी ३० मे रोजी गोव्याचा राज्यदिन साजरा केला जातो. आज गोवा राज्यदिनाचा ३८ वा वर्धापनदिन आहे.

३० मे १९८७ या दिवशी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला होता व गोवा भारताचं २५वं राज्य बनलं आणि यानंतर हा दिवस दरवर्षी राज्य गौरव दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो. त्यानिमित्ताने गोव्याचा स्वतंत्र राज्य होण्याचा प्रवास कसा होता ते जाणून घेऊया.

परकीय राजवटीची दीर्घकालीन सत्ता

गोवा अनेक वर्षे परकीय सत्तांच्या अधिपत्याखाली राहिला. १५१० पासून पोर्तुगीज सत्तेखाली असलेला गोवा भारत स्वतंत्र झाल्यानंतरही तब्बल १४ वर्ष त्यांच्या ताब्यातच राहिला. परंतु त्याआधी गोव्याला कदंब राजघराणं, बहामनी राज्य, विजयनगर साम्राज्य यांच्या अधिपत्याखाली देखील अनेक वर्ष काढावी लागली. स्थानिक जनतेच्या असंतोषाला आणि भारत सरकारच्या धोरणाला अनुसरून, १९६१ मध्ये 'ऑपरेशन विजय' अंतर्गत गोवा, दमण आणि दीव हे क्षेत्र भारतात समाविष्ट करण्यात आले.

पूर्ण राज्याचा दर्जा

विलीनीकरणानंतर गोवा केंद्रशासित प्रदेश होता. मात्र, गोव्याची वेगळी सांस्कृतिक ओळख, भाषा आणि परंपरा जपण्यासाठी स्थानिक लोकांनी स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा अशी मागणी सातत्याने लावून धरली. अनेक वर्षांच्या जनआंदोलनांनंतर, अखेर या मागणीची दखल घेत ३० मे १९८७ रोजी गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला. त्याच वेळी दमण आणि दीव स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश झाले.

राज्यदिनाचे महत्त्व

गोवा राज्य दिन म्हणजे एक ऐतिहासिक टप्पा, जिथे परकीय सत्तेपासून मुक्त झाल्यावर जनतेने स्वतःचं राजकीय आणि सांस्कृतिक अस्तित्व घडवून आणलं. हा दिवस संघर्ष, त्याग आणि लोकशाही मूल्यांच्या सन्मानाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी ३० मे रोजी गोवा आपल्या वाटचालीचे स्मरण करतो आणि पुढील पिढ्यांसाठीनवा मार्ग ठरवतो.

राज्यत्व प्राप्त झाल्यापासून गोवा पर्यटन, शिक्षण, आरोग्य, आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करत आहे. मात्र वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरण, पाणीप्रदूषण, आणि स्थानिक हक्क या बाबींसंदर्भात नवीन प्रश्नही निर्माण होत आहेत. गोव्यासारख्या संवेदनशील राज्यासाठी समतोल विकास ही आता काळाची गरज बनली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: अर्धवट कपडे अन् हातात विळा, बसमध्ये चढून व्यक्तीचा तरुणावर हल्ला अन्...; व्हायरल व्हिडिओनं बारामती हादरलं

Mumbai News: धारावी पुनर्वसनावरून नागरिकांचा रोष, मुलुंडमध्ये स्थलांतर विरोधात उपोषण; मविआचा पाठिंबा

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पंतप्रधान मोदींना अडकवण्याचा होता कट; साध्वी प्रज्ञासिंह यांचा खळबळजनक दावा

Latest Maharashtra News Updates Live: पुणे-बीडमध्ये वर्दीची भीती उरली नाही

Jalgaon Politics : सगळ्यांना मामा बनवणारे जिल्हाधिकारी!; गिरीश महाजन यांच्या कोपरखळीने सभागृहात हंशा

SCROLL FOR NEXT