टूरिझम

IRCTC Thailand Tour Package: थायलंडमध्ये साजरं करा नवीन वर्ष, चक्क इंडियन रेल्वेने लाँच केलं खास टूर पॅकेज

IRCTC चं नवं टूर पॅकेज! थायलंडमध्ये साजरं करा नवीन वर्ष

Aishwarya Musale

काही दिवसातच 2023 हे वर्ष संपून आपण 2024 या नव्या वर्षात पदार्पण करणार आहोत. अशा परिस्थितीत, जर तुम्हीही कुठेतरी प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC ने तुमच्यासाठी अतिशय स्वस्त एअर टूर पॅकेज आणले आहे, ज्यामध्ये तुम्ही थायलंडच्या दोन सुंदर शहरांना भेट देऊ शकाल. यामध्ये तुम्ही 60 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत थायलंडला भेट देऊ शकता. हे पॅकेज मुंबईपासून सुरू होणार आहे.

IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, IRCTC ने Treasures of Thailand ex Mumbai नावाचे टूर पॅकेज आणले आहे. या पॅकेजअंतर्गत तुम्हाला थायलंडमध्ये 4 रात्री आणि 5 दिवस प्रवास करण्याची संधी मिळेल. या पॅकेज दरम्यान, तुम्हाला बँकॉक आणि पटाया या सुंदर ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल. या संपूर्ण पॅकेजसाठी तुम्हाला किमान 58,900 रुपये खर्च करावे लागतील.

टूर पॅकेजमध्ये या सुविधा उपलब्ध असतील

या पॅकेजमध्ये पर्यटकांना हॉटेलमध्ये राहणे, फ्लाइट टिकट, खाणेपिणे आदी अनेक सुविधा मिळणार आहेत. नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची सुविधा IRCTC कडून पुरविली जाईल. जेवणाच्या योजनेबद्दल बोलायचे झाल्यास, या एअर टूर पॅकेजमध्ये तुम्हाला 5 ब्रेकफास्ट, 5 लंच आणि 4 डिनर मिळतील. IRCTC वेबसाइट irctctourism.com ला भेट देऊन प्रवासी या टूर पॅकेजसाठी बुकिंग करू शकतात.

टूर पॅकेजची खास वैशिष्ट्ये

पॅकेजचे नाव – Treasures of Thailand ex Mumbai (WMO033)

डेस्टिनेशन कव्हर - पटाया आणि बँकॉक

टूर डेट - 10 ते 14 जानेवारी 2024

टूर कालावधी - 5 दिवस/4 रात्री

मील प्लॅन - नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण

ट्रॅव्हलिंग मोड - फ्लाइट

विमानतळ/प्रस्थान वेळ – मुंबई विमानतळ/00:10 तास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT