Kaas Flower Season esakal
टूरिझम

Kaas Pathar वर फुलांच्या रंगछटा बहरण्यास सुरुवात; 'या' वेबसाइटवर जाऊन करा Online Booking, उद्यापासून रानफुलांची उधळण

रानफुलांची उधळण सप्टेंबर महिन्यात पाहायला मिळणार

सूर्यकांत पवार

फुले उमलण्यास पोषक वातावरण निर्माण झाले असून, रंगीबेरंगी फुलांच्या कळ्या उमलू लागल्या आहेत.

कास : जागतिक वारसास्थळ व विविधरंगी फुलांसाठी (Flower Season) प्रसिद्ध असलेल्या कास पठारावर (Kaas Plateau) फुलांच्या रंगछटा बहरण्यास प्रारंभ झाला असून, नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांची उधळण सप्टेंबर महिन्यात पाहायला मिळणार आहे.

या पार्श्वभूमीवर कास पठार कार्यकारी समितीच्या (Kaas Pathar Committee) वतीने यंदा हंगामाचा प्रारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत तीन सप्टेंबरपासून करण्यात येणार आहे. यंदा प्रत्येक गोष्टीसाठी असणारे वेगवेगळे शुल्क कमी करून दीडशे रुपयांत प्रवेश शुल्क, पार्किंगपासून पठारापर्यंत बस व इतर सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

गेल्या आठ दिवसांपासून परिसरात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. अधूनमधून श्रावण सरी कोसळत असल्याने फुलांच्या वनस्पती उमलण्यास पोषक वातावरण निर्माण झाले आहे. विविध फुलांच्या कळ्या उमलण्यास प्रारंभ झाला आहे. सध्या पठारावर चवर (रानहळद), पांढऱ्या रंगाची पंद, पाचगणी आमरी, सोनकी, तेरडा, गेंद, टूथब्रश, नीलिमा आदी विविध फुलांच्या रंगीबेरंगी कळ्या दिसू लागल्या आहेत.

ऊन-पावसाचा खेळ असाच सुरू राहिल्यास येत्या आठ- दहा दिवसांत विविधरंगी फुलांचा मोठ्या प्रमाणात बहर येऊन गालिचे पाहायला मिळतील. कास पठार कार्यकारी समितीच्या वतीने हंगामाचे नियोजन करण्यात आले असून, सुरक्षारक्षक व इतर कामांसाठी साधारणतः दीडशे लोकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

समितीमध्ये समाविष्ट असलेल्या गावांमधून हे लोक निवडण्यात आले आहेत. उन्हाळ्यात लोखंडी जाळी यंदा काढण्यात आली; परंतु पर्यटक फुलांच्या क्षेत्रात कसेही प्रवेश करत असल्याने सध्या पठारावर समितीच्या वतीने फुलांच्या भागाचे संरक्षण करण्यासाठी तात्पुरती तंगुसाची जाळी बसवली आहे. www.kas.ind.in या वेबसाइटवर जाऊन किंवा प्रत्यक्ष जागेवरही बुकिंग करता येणार आहे.

कास पठार कार्यकारी वन समितीचे दत्ता किर्दत यांनी सांगितले, की पठारावर फुलांचा हंगाम अगदी तोंडावर असून, कास पठार कार्यकारी समितीमार्फत पर्यटकांना सुलभ पर्यटन होण्यासाठी विविध सुविधा पुरविण्याबाबत तयारी सुरू आहे. येत्या रविवारपासून शुल्क आकारणी करून हंगामाची सुरुवात केली जाणार आहे.

फुले उमलण्यास पोषक वातावरण निर्माण झाले असून, रंगीबेरंगी फुलांच्या कळ्या उमलू लागल्या आहेत. पुढील आठवड्यापासून फुले बहरून पठारावर फुलांची चादर निर्माण होण्‍यास अनुकूल स्थिती आहे. पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी ऊन-पावसाचा खेळ पुढील महिनाभर सतत कायम राहिल्यास महिना ते दीड महिना फुलांचा हंगाम पर्यटकांना अनुभवायला मिळू शकतो.

-अभिषेक शेलार, वन समिती कर्मचारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Mental Naxalism Statement : 'नक्षलवादाने तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले'; मानसिक नक्षलवादाला ठेचल्याशिवाय भारत विकसित होणार नाही, पीएम मोदींचा जोरदार हल्ला

IND vs SL 1st Test: शुभमन गिलने जिंकला टॉस; भारताची प्रथम फलंदाजी, श्रीलंकेसमोर मोठं आव्हान उभं करण्याचा इरादा

Gen Z साठी मोदींच्या मोठ्या घोषणा; कोचिंग क्लास फ्री ते १ लाख कोटींचा इनोव्हेशन फंड, ५ मोठ्या घोषणा!

Independence Day Live Update : आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरू, स्वातंत्र्यदिन कार्यालयातच साजरा

Chakan Industrial Area Roads: वाहतूक कोंडीने उद्योगांची घुसमट; चाकण औद्योगिक क्षेत्राला जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था

SCROLL FOR NEXT