Kandati Valley esakal
टूरिझम

कास पठारला निघालात? सावधान! रक्तपिपासू जळवांचा प्रचंड सुळसुळाट

सूर्यकांत पवार

कास (सातारा) : जून महिन्यापासून सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे कास पठार (Kas Plateau) परिसर, सह्याद्रीनगर ते गाळदेवपर्यंतचा डोंगरमाथ्यावरील पट्टा, दुर्गम कांदाटी खोऱ्यातील (Kandati Valley) डोंगरमाथा अशा संपूर्ण भागात रक्त शोषणाऱ्या जळवांचा प्रचंड सुळसुळाट झाला असून, पाळीव जनावरे आणि माणसांना मोठ्या प्रमाणात लागून यांचा उपद्रव होत आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे जळवांचे प्रमाण दुप्पट झाल्याचे जाणकार बोलताना दिसत आहेत.

मानवी वस्तीपासून दूर असणाऱ्या या जळवा यावर्षी मोठ्या प्रमाणात मानवी वस्तीत आढळताना दिसत आहेत.

दरवर्षी जून महिन्याचा पाऊस सुरू झाला की, दलदलीच्या ठिकाणी जळवा आढळतात. ज्या ठिकाणी पालापाचोळा, गवत कुजलेले असते. अशा ठिकाणी यांचा वावर प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात असतो. मानवी वस्तीपासून दूर असणाऱ्या या जळवा यावर्षी मोठ्या प्रमाणात मानवी वस्तीत आढळताना दिसत आहेत. शिवारात चरावयास गेलेल्या जनावरांच्या माध्यमातून जळवा घरापर्यंत पोचत आहेत. अनेक पर्यटकांना या जळवा लागून रक्तस्त्रावाला सामोरे जावे लागत आहे.

यावर्षी पावसाची रिपरिप सारखीच सुरू असल्याने जळवांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विषारी जळवांमुळे रक्त पिलेल्या ठिकाणी जखमा होत असून, सातत्याने खाज सुटते. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. पाऊस जावून कडक उन पडल्याशिवाय जळवांचा धोका कमी होणार नसून, पावसाला वैतागलेल्या लोकांना या नवीन त्रासाने चांगलेच जेरीस आणले आहे.

जळवांपासून अशी घ्यावी काळजी...

  • कास परिसरात फिरताना जळवा लागण्याचा धोका असून, शक्यतो पायावर जास्त चढतात. ज्या ठिकाणी रक्त पिते त्या ठिकाणी खाज सुटते. खाज होत असल्यास त्या ठिकाणी लगेच पाहा, दुर्लक्ष करू नका.

  • गवतातून फिरून आल्यावर पाय नीट पाहा. नीट लक्ष दिल्यास जळवा चिकटलेली लक्षात येते.

  • पायावर चढल्यास घाबरू नका. कागद वगैरे घेऊन पकडून काढून टाका. रक्त येत असलेल्या ठिकाणी हळद मिळाल्यास लावा.

  • कोरोनामुळे प्रत्येकाच्या जवळ सॅनिटायझर असते. जळवावर सॅनिटायझर मारल्यास तत्काळ चिकटलेली जागा सोडून ती मरण पावते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari : विमान अपघातावर मिटकरींचे गंभीर प्रश्न; सहा मृतदेहांपैकी एकाचा ठावठिकाणा अद्याप अज्ञात

WPL 2026: Mumbai Indians चे आव्हान संपले! दिल्ली कॅपिटल्सच्या युपीवरील विजयाने प्लेऑफचं चित्र स्पष्ट

Railway recruitment: रेल्वेमध्ये तब्बल २० हजारांहून अधिक 'ग्रुप डी' पदांसाठी भरती सुरू ; इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारही करू शकतात अर्ज

Pune Water News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ८ ते १० दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार; पाणीटंचाईची भीती

Sangli Hit And Run : गणपती पेठेत ‘हिट अँड रन’चा थरार, चार पोलिसांसह अकरा जखमी; नशेतधुंद कार चालकास जमावाने तुडवले

SCROLL FOR NEXT