शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर या गावात कोपेश्वर हे मंदिर आहे.
शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर या गावात कोपेश्वर हे मंदिर आहे.  sakal
टूरिझम

World Tourism Day 2021 : इतिहासातील शिल्पकलेच्या 'सुवर्णपानाला' द्या भेट

अर्चना बनगे

गेली दोन वर्षे कोरोनामुळे देशभरातील पर्यटन (Tourism) बंद आहे. राज्य सरकारने ७ आॅक्टोंबर ला मंदिर खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता पर्यटनाला नक्कीच चालना मिळणार आहे. या दोन वर्षात हाॅटेलसह इतर व्यावसायिकांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या निर्णयामुळे आता पर्यटन हळूहळू सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

पश्चिम महाराष्टात विशेषत: कोल्हापूरच्या पर्यटनाला (Kolhapur Tourism) अधिक महत्व आहे. कोल्हापुरात करवीर निवासिनी आंबाबाई मंदिर, दख्खनचा राजा ज्योतिबा, पन्हाळा, नृसिंहवाडी दत्त मंदिर (Ambabai Temple, Jotiba Tempal , Panhala, Nrusinhwadi Datta Temple) अशी महत्वाची गडकोट किल्ले तसेच धार्मिक ठिकाणे आहेत. त्यातच आता केरळच्या (Keral Tourism) धर्तीवर कोल्हापूरचे पर्यटनाचे मॉडेल विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार (Rahul Rekhawar) यांनी जिल्ह्यातील ३० पर्यटनस्थळे निश्‍चित केली आहेत. या आठवड्यात त्या स्थळांना भेटी देऊन पर्यटनाच्या दृष्टीने त्यांचा आराखडा करण्यात येणार आहे. यानंतरच किती प्रमाणात खुली केली जाईल याबाबतचा निर्णय होईल. तुम्हाला जर कोल्हापूरच्या पर्यटनाला यायच असेल तर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ (Shirol) तालुक्यातील हे महत्वाचे ठिकाण मिस करू नका. नेमके कोणते ठिकाण जाणून घेऊया..

शिरोळात आहे शिल्पकलेचा उत्तम नमुना

शिरोळ तालुका हा पूर्वीपासूनच पर्यटनासाठी प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. सहकाराने समृद्ध आणि निसर्गसंपन्न आणि प्रेरणादायी असा हा  तालुका आहे. याचबरोबर शेतीबरोबरच सहकार, पर्यटन सांस्कृतिक धार्मिक अधिष्ठान लाभलेला  सुजलाम-सुफलाम समृद्ध असा आहे. याचे महत्वाचे वैशिष्टे म्हणजे शिरोळ तालुका कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात जास्त शासनाला विविध प्रकारचा महसूल देतो. अशा या तालुक्यात शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे ते म्हणजे कोपेश्वर मंदिर.

शिल्पकलेचा उत्तम नमुना

महाराष्ट्राचा खजुराहो असाही लौकिक

शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर या गावात कोपेश्वर हे मंदिर आहे. ज्याला शिल्पकलेच्या इतिहासातील "सुवर्णपान' म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राचा खजुराहो असाही लौकिक खिद्रापूरच्या कोपेश्‍वर मंदिराला आहे. सुमारे एक एकराच्या विस्तीर्ण परिसरात पाषाणातून हे मंदिर साकारलेले आहे. प्राचीन शिल्पवैभवाची साक्ष असलेल्या हे मंदिर बाराव्या शतकाच्या अखेरीस म्हणजे साधारण आठशे ते नऊशे वर्षांपूर्वीचे आहे. त्याची रचना हत्तींनी आपल्या पाठीवर मंदिर पेलल्यासारखी आहे. 48 खांबांवर आधारलेला स्वर्गमंडप व भिंतीवरचे रेखीव कोरीव काम हे या मंदिराचे खास वैशिष्ट्य आहे. मंदिराच्या छतावरचा किमान 20 फुटांचा भाग गोलाकार उघडा असून पौर्णिमेच्या काळात या गोलाकार भागातून मंदिरात येणारा चंद्रप्रकाश आणि त्यातून खुलणारे मंदिराचे शिल्पसौंदर्य हा मंदिर शिल्पकला व प्रकाशयोजनेचा एक अमूल्य ठेवा मानला जातो.

या मंदिराचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला तीन प्रवेशद्वारे आहेत.

कलाकुसरीचे कसब जागतिक दर्जाचे

या मंदिराचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला पूर्वाभिमुख, दक्षिणाभिमुख आणि उत्तराभिमुख अशी तीन प्रवेशद्वारे आहेत. नगारखान्यासह अलौकिक स्वर्गमंडप, सभामंडप, अंतराळकक्ष, गाभारा व अनेक ओतीव सुबक चकाकणारे आणि कोरीव कामाने नटलेले खांब आणि त्यावर मजबूत अशा छतांची मांडणी करण्यात आली आहे. गजरथातील गजांची प्रभावळ, मधल्या भागातील देवदेवतांची शिल्पे, प्रतिमा आणि नृत्य-गायनवादनात रममान झालेल्या रूपगर्वितांच्या प्रतीमा अतिशय आकर्षक घडविण्यात आल्या आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये कोपेश्‍वर व धोपेश्‍वर या शैववैष्णवांची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. वास्तूरचनेचे सौंदर्य, रचना, कोरीव काम आणि कलाकुसरीचे कसब जागतिक दर्जाचे आहे. या मंदिरास हॉलंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, जपान येथील हजारो पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत. राज्याचा सांस्कृतिक ठेवा असणारे मंदिर सर्वच बाबतीत उत्कृष्ट असणाऱ्या खजुराहो, हाळेबीड, बेल्लूर, कोणार्क, बदामी येथील शिल्प मंदिरांच्या पंक्तीत बसणारे आहे. अश्या या मंदिराला तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता.

कोल्हापूर पासून ६० किमी अंतरावर पूर्वेकडे हे ठिकाण आहे.

असे जाऊ शकता

कोल्हापूर पासून ६० किमी अंतरावर पूर्वेकडे हे ठिकाण आहे. याशिवाय तुम्ही दोन मार्गाने जाऊ शकता. कोल्हापूर, इचलकरंची, कुरुंदवाड, राजापूर, राजापूरवाडी, खिद्रापूर.तसेच कोल्हापूर सांगली महामार्गावरुन जयसिंगपूर मार्गे जाऊ शकता. आणखी एक मार्ग आहे तो म्हणजे कोल्हापूर- हुपरी औद्यौगिक वसाहतीवरून खिद्रापूर.

या ठिकाणांना भेट द्या

या प्रवासात तुम्ही हुपरी येथील चांदीनगरी पाहू शकता. जर तुम्ही इचलकरंची--नृसिंहवाडी कुरुंदवाड मार्गे जाणार असाल तर इचलकरंजीत वस्त्रोद्योग पाहू शकता. याशिवाय नृसिंहवाडी कृष्णा काठी वसलेले दत्त मंदिर पाहू शकता. कुरूंदवाड घाट पाहू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Archery World Cup : तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीयांचा डंका! पुरुष आणि महिला कंपाऊंड संघांनी पटकावली सुवर्णपदके

Latest Marathi News Live Update: नैनीतालमधील वणवा आटोक्यात आणण्यासाठी लष्कराच्या हेलिकॉप्टरची मदत; व्हिडिओ समोर

Tesla Layoffs: इलॉन मस्कच्या कंपनीत चाललंय काय? आणखी काही कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

Baba Ramdev: पतंजली समूह नवीन कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत; काय आहे बाबा रामदेव यांचा प्लॅन?

Raw Mango: उन्हाळ्यात कैरीचा थंडगार कचुंदा घरीच नक्की करा ट्राय, जाणून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT