टूरिझम

समुद्री सफारीचा आनंद घ्यायचाय? भारतातील 'या' ठिकाणी भेट द्या

सकाळ डिजिटल टीम

निर्सगाचा समुद्री अनमोल खजिना पाहायचा असेल तर तुम्ही लक्षद्वीपला जरूर भेट द्यायला हवे. लक्षद्वीप समुद्रातील बेटांचा एक समूह आहे. भारतातील आठ केंद्रशासित प्रदेशांपैकी सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश म्हणून ओळखला जातो. लक्षदीप बेट विस्ताराने लहान असून, त्यांची समुद्रसपाटीपासूनची उंची तुलनेने कमी आहे. याठिकाणी आराम करण्यासाठी नाहीतर स्कूबा डायव्हिंगसाठी हे ठिकाण प्रसिध्द आहे. लक्षद्वीपचे हवामान आल्हाददायक असते. मात्र मार्च, एप्रिल व मे महिन्यांत याठिकाणी कडक उन्हाळा जाणवतो. याठिकाणचे तापमान 30 अंशाच्या वर जात नाही. तुम्ही समुद्र सफारीचा वेगळा आनंद घेण्यासाठी हा पर्याय निवडू शकता.

समुद्रसपाटीचा घ्या आनंद

लक्षद्वीप समुद्रकिनारे आणि प्रवाळांची भूमी असणारा प्रदेश आहे. याठिकाणी लांब पल्याचे किनारे आहेत. तुम्ही मावळत्या सूर्याचा नजारा पाहू शकता. गर्दीपासून जर लांब राहायच असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट आहे. सुंदर पोवळ्यांसाठी हे ठिकाण फेमस आहे. तुम्ही हे पाहण्याचा आनंद ही घेऊ शकता.

लक्षद्वीप यासाठी ही आहे फेमस

विदेशी पर्यटकांना अश्या ठिकाणी जायला खूप आवडते. प्रवाळ बेट, अगत्ती बेट या समुद्रकिनाऱ्यावर कडक ऊन असल्यामुळे निवांत क्षण घालवण्यासाठी या ठिकाणांना पसंती दिली जाते. हिरव्या नारळाच्या झाडांनी झाकलेल्या या सुंदर आणि विशाल किनाऱ्याला भेट देण्यासाठी जाऊ शकता.

बंगाराम बीच

बांगाराम बेट लक्षद्वीपचे रहस्यमय असे बेट आहे. हे ठिकाण वॉटर स्पोर्ट्स प्रेमींसाठी बेस्ट आहे. स्कूबा डायव्हिंग, खोल समुद्रात मासेमारी, स्नॉर्कलिंग, कयाकिंग, विंडसर्फिंग वॉटर स्पोर्ट्सचा याठिकाणी आनंद घेऊ शकता.

सीफूड मिनिकॉय

तुम्ही जर खाण्याचे शौकिन असाल तर सीफूड मिनिकॉय याठिकाणी तुम्हाला केरळ ते कोकणची चव चाखायला मिळेल. मुस कबाब, फिश करी कबाब, गरमागरम भात, रोटी अशा सर्व प्रकारच्या डिशेसचा आनंद तुम्ही इथे घेऊ शकता. तसेच ताजे क्रिस्पी ऑक्टोपस फ्राई आणि ताजे पकोडे देखील खाण्याचा आनंद घेता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : कळंबा कारागृहात दंगा- आरडाओरड करण्यास मनाई केल्याने अधिकाऱ्याला मारहाण

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

पाकिस्तानचं नवीन नाटक! PCB नंतर आता हॉकी संघाने भारतात येण्यास दिला नकार; म्हणतात, आमच्या खेळाडूंना सुरक्षित वातावरण हवंय...

CM Devendra Fadnavis : मनोज जरांगे पाटील यांच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य! आंदोलन करून गणेशोत्सवावर ताण आणू नका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT