Lonad caves sakal media
टूरिझम

रखरखीत कातळावरील पालवी

प्रशांत ननावरे

मुंबई, नवी मुंबई, कल्याण किंवा ठाणे येथून एका दिवसाच्या छोट्या सहलीसाठी लोनाडची लेणी हा उत्तम पर्याय आहे. इतिहास आणि शिल्पकलेची आवड असणाऱ्यांनी तर मुद्दाम या आडवाटेच्या गावाला जायला हवे. व्यापारी केंद्र म्हणून मुंबई नावारूपाला येण्याच्या काळात एकेकाळी प्रचंड समृद्ध असलेली अनेक छोटी शहरं दुर्लक्षित होत गेली. मुंबईकडे वर पाहताना अनेक शतकांचा ऐतिहासिक ठेवा जपणारी आणि मुंबईच्या प्रवेशद्वारावर विस्तारलेली ही शहरं आजही अनेक सुविधांच्या प्रतीक्षेत आहेत. असं असलं तरी तिथल्या ठेव्यामुळे भटक्यांना स्वत:कडे आकर्षित करत असतात. भिवंडीजवळील ‘लोनाड’ हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण. बौद्धकालीन लेण्यांसाठी लोनाड हे छोटेसे गाव प्रसिद्ध आहे.

रुक्ष आणि रखरखीत भिवंडी बायपासच्या मुंबई-नाशिक महामार्गावरून थोडं पुढे गेल्यावर सोनाळे फाट्यावरून एक रस्ता लोनाड गावात जातो. रस्त्यावरून पुढे जात राहिल्यास एक टेकडी दिसते. लोनाडची लेणी याच टेकडीवर आहे. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा या लेण्यांना भेट देण्यासाठी योग्य कालावधी आहे. हे गाव थोडं आडवाटेला असल्यामुळे स्वतःची दुचाकी किंवा चारचाकी वाहन असणे श्रेयस्कर ठरते.

टेकडीच्या पायथ्याशी एक मंदिर असून तिथून पुढे टेकडी चढावी लागते. टेकडीवर जाण्यासाठी कच्चा रस्ता असल्यामुळे पुढे इतकी प्राचीन लेणी खरंच असेल का, अशी शंका येते. मंदिरापासून लेण्यांपर्यंचे चालत अंतर वीस ते पंचवीस मिनिटांचे आहे. त्यानंतर आपण दोन टेकड्यांच्या मधल्या पाखेत जाऊन पोहोचतो. कातळामध्ये कोरलेली ही लेणी म्हणजे शिल्पसौंदर्याचा उत्तम नमुना होय; मात्र या टेकडीवर ही एकच लेणी का, याचे कुतुहल वाटते.

lonad caves

लेण्याच्या समोरील मोकळ्या जागेत तुळशी वृंदावन असून तेथे वऱ्हांडाही आहे. आतमध्ये मोठे चैत्यगृह आहे. टेकडी चढून आलेल्या आणि आजबाजूला फिरून घामाघुम झालेल्या देहाला चैत्यगृहात शिरल्यावर गारव्याची अनुभूती येते. लेण्याला चार कोरीव खांब दिसतात. त्यापैकी एक खांब वरून अर्धा तुटलेला असून इतर तीन खांबांचीही थोडी पडझड झाल्याचे दिसते. लेणीच्या प्रवेशद्वाराजवळच साधारणतः पाच ते सहा फूट उंचीच्या दगडात कोरलेले शिल्प दिसते. या रचनेला शेंदूर फासून त्याचे सौंदर्य बिघडवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. खांबांच्या डाव्या बाजूला पाण्याचे टाके आहे. कोणत्याही ऋतूमध्ये या टाक्यामध्ये थंडगार पाणी असते, हे विशेष. लेण्याच्या आतील छोटेखानी चैत्यगृहाच्या भिंतीवर कोरीव काम केलेले आहे. खांबांवर आणि माथेपट्टीवरही शिल्पे कोरलेली दिसतात. काही भाग अर्धवट कोरलेला आहे. चैत्यगृहात दोन गाभारे असून एका गाभाऱ्यात खांडेश्वरी देवीची, तर दुसऱ्या गाभाऱ्यात गणपतीची मूर्ती आहे.

लोनाड लेण्याच्या टेकडीवरून भिवंडी बायपास रस्ता नजरेच्या टप्प्यात दिसतो. लेणी पाहून टेकडीवरून खाली उतरल्यावर गावातील शिलाहार काळातील प्राचीन शिवमंदिरही पाहण्यासारखे आहे. मंदिराचा बाहेरील भाग थोडा जीर्ण झालेला असला, तरी मंदिराच्या विविध भागांचे अवशेष विखुरलेले दिसतात. दगडाला दिलेला आकार आणि त्यावर केलेले नक्षीकाम सुंदर आहे. मंदिराचा गाभारा मात्र सुस्थितीत आहे. या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर आकर्षक कोरीव काम केलेले दिसते. शिवमंदिरापासून जवळच शाळेच्या मागील एका शेतात एक मोठा शीलालेख ठेवलेला आहे, तो जरुर पाहावा.

मुंबई, नवी मुंबई, कल्याण किंवा ठाणे येथून एका दिवसाच्या छोट्या सहलीसाठी या ठिकाणाचा विचार करायला हरकत नाही. सुट्टीचा आनंद लुटता येतोच; शिवाय ऐतिहासिक ठिकाणालाही भेट देऊन होते. इतिहास आणि शिल्पकलेची आवड असणाऱ्यांनी तर मुद्दाम या आडवाटेच्या गावाला जायला हवे.

nanawareprashant@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Retirement Plan : मोठी बातमी! अमित शहांनी सांगितला ‘रिटारयमेंट प्लॅन'

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Bhoom Crime : भूममध्ये कत्तलीसाठी जाणारी १६ जणावरे पकडली, आठ लाखाचा मुद्देमाल जप्त

Lungs Health Tips: थोडं चाललं तरी धाप लागते? श्वास घेताना त्रास होतोय? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेले ५ सोपे घरगुती उपाय!

Bike Accident : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; १ जण ठार, तर ३ जण जखमी

SCROLL FOR NEXT