टूरिझम

लेह-लडाख ट्रीप सुरू करण्यापूर्वी या 5 गोष्टी लक्षात असू द्या..

लेह-लडाख मध्ये सामान्यपेक्षा आॅक्सीजन कमी असते त्यामुळे योग्य ती काळजी तुम्ही घेतली नाही तर तुम्हाला अनेक समस्यांना समोरे जावे लागेल.

भूषण श्रीखंडे

जळगावः जगातील अदभूत स्थळ पैकी एक लेह-लडाख असून येथे अनेक पर्यटक भेट देत असतात. येथे काश्मिरसारखी हिरवळ, बर्फाचे पर्वत नसून येथे उजाड पर्वत दिसतील. पण भरपूर मोहक येथील सहल तुम्हाला नक्की आनंदीत करेल. पण येथे येण्यापूर्वी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या त्या पाळाव्या लागतात. आणि आपली सहल आनंदी करावी लागते. चला तर जाणून घेवू लेह-लडाख बद्दल..

ऑक्सिजनची पातळी होते कमी..

विमानातून प्रवास करून आल्यावर लगेच पहिल्या दिवशी लेहला गेल्यास तुम्हाला कमी आॅक्सीजनचा खूप त्रास होते. लेहमध्ये सामान्यपेक्षा आॅक्सीजन कमी आहे आणि वर चढल्यावर ती आणखी कमी होऊ लागते. त्यामुळे लेह शहरात दोन दिवस आधी मुक्काम करा नंतर दोन-तीन दिवसानंतर नुब्रा, चांगला पास, खारदुंगला पास, पांगोंग लेक याठीकाणी जाण्याचे नियोजन करा. तुम्ही हे केले नाही तर उच्च उंचीवर आजारी पडण्याची शक्यता जास्त असते.जर तुम्ही उच्च उंचीवर गेलात आणि तुम्हाला श्वास घेण्यात अडचण येत असेल तर लगेच 500-700 मीटर खाली या. खारदुंगला सारख्या ठिकाणी ऑक्सिजन 50% पर्यंत पोहोचू शकतो त्यामुळे तिथे जास्त वेळ थांबू नका.

भेटीच्या परवानगी घेतल्या का..

लडाखची आणखी एक मोठी समस्या म्हणजे तेथे अनेक ठिकाणी जाण्यासाठी परवानग्या घेणे आवश्यक असते. जर विना परवानगी तुम्ही गेल्यातर येथे जाण्यास तुम्हाला परवानगी मिळणार नाही. टूर-ट्रॅव्हल एजंट याकडे लक्ष देत नाही त्यामुळे नियोजन करण्यापूर्वी परवानगी घेतली का याची खात्री करून घ्या.

लष्करी तळाचे फोटोग्राफी करू नका

लडाख मध्ये अनेक सुंदर ठिकाणांनी भरलेले असून कुठलेही फोटो तुम्ही काढू नका. कारण लडाखमध्ये सर्वत्र लष्करी तळ आहेत. तुम्ही चुकीने येथील फोटो काढले तर तुम्हाला पैसे मोजावे लागतील. तसेच लेह विमानतळ हे एक लष्करी विमानतळ येथे फोटो अथवा व्हिडीओ तुम्ही काढू शकत नाही. काढल्यास तुम्हाला लष्कराच्या अनेक गोष्टींना समोरे जावे लागेल. त्यामुळे लेह व लडाखमध्ये भान ठेवून फोटो काढवेत.

तयारीशिवाय बाईक ट्रिप करू नका..

अनेकांना लडाख मध्ये बाईक ट्रिप सर्वोत्तम सहज व सोपी वाटते. पंरतू लडाखची सहल सोपी नसून खडतर आहे. जाण्या आगोदर येथे तयारी करणे आवश्यक असून यात तुम्ही योग्य थंड कपडे, अतिरिक्त पेट्रोल, उंचीमुळे होणाऱ्या आजारांसाठी औषधे, पोर्टेबल ऑक्सिजन घेणे आवश्यक तेच भेट देण्याचा परमिट, काही खाद्यपदार्थ, इलेक्ट्रोल पावडर इत्यादी वस्तू ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे लडाखची बाईक ट्रीप तुम्हाला तुला खूप त्रास देतो.

जड अन्न सेवन करू नये -

लडाख ट्रीप करत असतांना पाणी पिणे महत्वाचे आहे जेणेकरून तुमचे शरीर डिहायड्रेट होऊ नये. तसेच प्रवास करताना जास्त जड अन्न खाऊ नये हलखे अन्न खावे. जास्त जड अन्न खाल्ल्याने तुम्हाला गॅस व अनेक संबंधित समस्या उद्भवू शकतात. तसेच चालतांना तुम्हाला दमही लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

विहानला खेळायला जायचंय, तो येईल; बसवर झाड कोसळून मुलाचा मृत्यू, आई पाहतेय वाट, घरासमोरच घडली दुर्घटना

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

SCROLL FOR NEXT