Navratri 2024: Sakal
टूरिझम

Navratri 2024: भारतातील 'या' प्रसिद्ध माता दुर्गा मंदिरांना एकदा नक्की भेट द्या,सर्व मनोकामना होतील पूर्ण

Mata Durga Temple: नवरात्रीत भारतातील माता दुर्गाच्या प्रसिद्ध मंदिरांना भेट देऊ शकता. ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल आणि आयुष्यात भरभराट येईल.

Puja Bonkile

Mata Durga Temple: नवरात्रीला ३ ऑक्टोबरपासून सुरूवात झाली आहे. देशभरात नवरात्रीचा उत्साह आनंदात साजरा केला जातो. अनेक भाविक मातेच्या भक्ततीत तल्लीन झाले आहेत. नवरात्रीत नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जातेे. अनेक भाविक माता दुर्गेच्या मंदिरांना भेट देतात. माता दुर्गेची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. तुम्ही भारतातील प्रसिद्ध माता दुर्गेच्या मंदिरांना भेट देऊ शकता.

मनसा देवी मंदिर

मनसा देवी मंदिर उत्तराखंडमध्ये बांधले आहे. हरिद्वारजवळ झुंझुनू रोडवर सादुलपूर गावात मां मनसा देवीचे मंदिर आहे. जेथे दर्शन घेतल्याने भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

चामुंडा मंदिर

माता चामुंडा देवीचे मंदिर हिमाचल प्रदेशात वसलेले आहे. हे मंदिर पालमपूर जिल्ह्यापासून काही अंतरावर बाणेर नदीच्या काठावर आहे. जिथे माता चामुंडा देवीशिवाय भगवान शिव मृत्यूच्या रूपात राहतात. चामुंडा देवीचे दर्शन घेण्यासाठी कांगडा विमानतळ किंवा पठाणकोट रेल्वे स्थानकावर यावे लागते. त्यानंतर खाजगी टॅक्सी किंवा बसने या मंदिरापर्यंत सहज पोहोचता येते.

करणी माता मंदिर

राजस्थानच्या बिकानेरपासून ३० किमी अंतरावर देशनोक येथे करणी मातेचे मंदिर आहे. या मंदिराला उंदराचे मंदिर देखील बोलले जाते. यंदा नवरात्रीत नक्की या मंदिरात जाऊन माता देवीचे दर्शन घ्यावे. या मंदिरात २५ हजारांहून अधिक उंदिर राहतात.

अंबा माता मंदिर

गुजरातमधील जूनागढमध्ये अंबे मातेचे मंदिर आहे. येथे दूरदूरवरून भाविक दर्शनासाठी येतात. बाराव्या शतकात बांधलेल्या या मंदिराला भेट दिल्यास सुखी वैवाहिक जीवनाचा आशीर्वाद मिळतो. हे मंदिर उंच डोंगराच्या माथ्यावर बांधले आहे. या मंदिरात जाण्यासाठी रोपवेची मदत घ्यावी लागते.

दक्षिणेश्वर काली माता मंदिर

कोलकत्ता येथील विवेकानंद ब्रिजच्या उत्तरेस दक्षिणेश्वर काली माता मंदिर वसलेले आहे.या मंदिराला लागूनच १२ मंदिरे आहेत जी भगवान शिवाला समर्पित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

Agriculture Day Celebration: घोडेगावात कृषी दिन उत्साहात साजरा; आधुनिक तंत्रज्ञान, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शेतकऱ्यांचा सन्मान

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

SCROLL FOR NEXT