Radhanagari-Dajipur Wildlife Sanctuary esakal
टूरिझम

Dajipur Sanctuary : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! दाजीपूर अभयारण्य 'या' दिवशी होणार खुले, जंगल सफारीही होणार सुरू

पर्यटन हंगामाच्या चाहूलीने दाजीपूर पर्यटकांसाठी (Tourists) गजबजणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

पर्यटन हंगाम सुरू होत असल्याने, पर्यटन व्यवसायालाही बरकत येणार आहे.

राधानगरी : जागतिक वारसास्थळाचे कोंदण लाभलेले आणि जैवविविधतेने संपन्न राधानगरी-दाजीपूर वन्यजीव अभयारण्य (Radhanagari-Dajipur Wildlife Sanctuary) यंदाच्या पर्यटन हंगामात उद्या (१ नोव्हेंबर) पर्यटकांसाठी खुले होणार आहे. पावसाळ्यामुळे पाच महिने बंद राहिलेल्या ‘जंगल सफारी’ला प्रारंभ होईल.

पर्यटन हंगामाच्या चाहूलीने दाजीपूर पर्यटकांसाठी (Tourists) गजबजणार आहे. पर्यटकांसाठी डॉरमेटरी, तंबू निवास अँम्पीथिएटर, मोक्याच्या ठिकाणी निरीक्षण मनोरे, फुलपाखरू उद्यान, जैवविविधता पशुपक्षीविषयक माहिती केंद्र आदी सुविधांमुळे वर्षागणिक अभयारण्य क्षेत्रात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्या वाढत आहे.

पर्यटन हंगाम सुरू होत असल्याने, पर्यटन व्यवसायालाही बरकत येणार आहे. ग्राम परिस्थितीकीय समितीच्या नियंत्रणाखाली भाडेतत्त्वावरील वाहनांमुळे सुरक्षित ‘जंगल सफारी’ व्यवस्था निर्माण झाली आहे. सध्या तीस जिप्सी जंगल सफारीसाठी तैनात आहेत. जंगल सफारी वाहन व्यवस्थेतून वन्यजीव विभागाने स्थानिकांना रोजगारासाठी नवीन संधीच मिळवून दिली आहे.

पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांना प्राधान्य आणि ग्राम परिस्थितीकीय विकास समितीमार्फत पर्यटन व्यवस्थापन यंदाच्या पर्यटन हंगामाचे वैशिष्ट्य ठरणार आहे. अभयारण्य क्षेत्रात ठक्याचा वाडा येथे आणखी चार नवीन तंबू निवासाची उभारणी केली आहे. पर्यटकांसाठी दहा तंबू निवास उपलब्ध झाले आहेत. लवकरच दाजीपुरातील एमटीडीसीचे सर्व सुविधायुक्त अद्यायवत ‘हॉलिडे रिसॉर्ट’ पर्यटकांसाठी खुले होतील.

हे रिसॉर्ट पर्यटन विकास आणि पर्यटन सुविधांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील. पर्यटकांना खात्रीची व सुरक्षित निवास आणि भोजन व्यवस्था मिळण्याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. भविष्यात नवे उपक्रम आणि निसर्ग पर्यटनात स्थानिकांचा सहभाग वाढीवर भर राहील.

-अजय माळी, वन्यजीव अधिकारी दाजीपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

IND vs PAK सामन्यानंतर वातावरण तापलं; सूर्या अन् हार्दिक कुलदीप यादववर भडकले, नेमकं काय घडले; पाहा Viral Video

5G च्या नावाखाली तुमची फसवणूक तर होत नाहीये ना? घरबसल्या 'इथून' चेक करा तुमच्या एरियातलं नेटवर्क

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

Central Railway: शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ, आरक्षण सुरू; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT