Ramtirth Waterfall esakal
टूरिझम

Amboli Ghat : आंबोलीतला 'हा' धबधबा झाला प्रवाहित; घाटात 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस, हिरण्यकेशीला मोठ्या प्रमाणात पाणी

गेले पंधरा ते वीस दिवस आंबोली परिसरात पावसाळी वातावरण तयार झाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

आंबोली परिसरात दोनशे मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याने ओढे व नाल्यांना पाणी आले आहे.

आजरा : आंबोली (Amboli) परिसरात झालेल्या पावसामुळे हिरण्यकेशी नदीला (Hiranyakeshi River) पाणी आले आहे. नदी पात्रालगत भरून वहात आहे. यामुळे रामतीर्थ येथे असलेला रामतीर्थ धबधबा (Ramtirth Waterfall) प्रवाहित झाला आहे. पश्चिम भागातील नदीकाठच्या गावातील पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

गेले पंधरा ते वीस दिवस आंबोली परिसरात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. येथे दररोज वीस ते पंचवीस मिलीमीटर पाऊस पडत आहे. आजरा तालुक्यातही ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. आंबोली परिसरात दोनशे मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याने ओढे व नाल्यांना पाणी आले आहे.

हिरण्यकेशी नदीला पाणी आले आहे. आज सकाळी हिरण्यकेशीवरील साळगाव बंधाऱ्यातून पाणी पुढे सरकले आहे. काल दुपारपासून रामतीर्थ धबधबा प्रवाहित झालेला आहे. पावसाचे वातावरण लक्षात घेता शेतकऱ्यांनी नदीकाठावरील वीज पंप काढून घेतले आहेत.

सर्फनाल्यात होणार ६६ टक्के पाणीसाठा

यंदा सर्फनाला प्रकल्पात कोणत्याही परिस्थितीत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आखले आहे. या प्रकल्पाच्या घळभरणीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या प्रकल्पात ६६ टक्के पाणीसाठा करण्याचे पाटबंधारेचे नियोजन आहे. त्यामुळे अनेक गावांचा उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

जिल्ह्यात पावसाची पुन्हा हजेरी

कोल्हापूर : मृग नक्षत्राच्या सुरुवातीला पडलेल्या पावसानंतर आठवड्याभराने पुन्हा एकदा आज हजेरी लावली. शहरात हलक्या सरी कोसळल्या, तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. दिवसभर उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना सायंकाळनंतर पडलेल्या पावसाने दिलासा मिळाला. जिल्ह्यातही धरण क्षेत्रासह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalsubai Trek Rescue: मुंबईचे पर्यटक, वाटाड्या न घेता गेले अन् जंगलात हरवले; रात्र होताच ११२ वर केला कॉल, वनरक्षकांकडून पहाटे सुटका

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Marathi News Live Updates : जनगणनेशिवाय महिला विधेयक अशक्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

SCROLL FOR NEXT