Summer Vacation Travel esakal
टूरिझम

Summer Vacation Travel : उन्हाळ्याच्या सुट्टीत कुटुंबासोबत बजेट-फ्रेंडली ट्रीप प्लॅन करायचीय? मग, 'ही' ठिकाणे करा एक्सप्लोअर

Summer Vacation Travel : यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही देखील मुलांसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करत आहात?

Monika Lonkar –Kumbhar

Summer Vacation Travel : सध्या काही मुलांच्या परीक्षा संपत आल्या आहेत, तर काही मुलांच्या परीक्षा संपून त्यांना सुट्ट्या लागल्या आहेत. मुले खास करून उन्हाळ्याच्या सुट्टीची आवर्जून वाट पाहत असतात. कारण, ही सुट्टी मोठी असते आणि या सुट्टीत मुलांना फिरायला जायला आवडते.

मुलांना ही सुट्ट्या लागल्यानंतर पालक देखील मुलांसोबत फिरायला जाण्याचे प्लॅन्स बनवतात. यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही देखील मुलांसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करत आहात? मग, हा लेख शेवटपर्यंत वाचा. कारण आज आम्ही तुम्हाला देशातील काही अशा ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. जिथे तुम्ही फिरण्याचा मनमुराद आनंद घेऊ शकाल. कोणती आहेत ती ठिकाणे? चला तर मग जाणून घेऊयात.

लोणावळा

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण म्हणून लोणावळा प्रसिद्ध आहे. उन्हाळ्यात येथील वातावरण आल्हाददायक असते. कुटुंबासोबत फिरण्यासाठी हे एक बेस्ट ठिकाण आहे. येथील उंच पर्वत, डोंगरदऱ्या, धबधबे, आसपासचे किल्ले आणि मनमोहक निसर्ग तुमच्या मनाला भुरळ घालतो. केवळ १० हजारांमध्ये तुम्ही कुटुंबासोबत ही लोणावळ्याची शॉर्ट ट्रीप प्लॅन करू शकता. (Lonavala)

जैसलमेर

राजस्थान या राज्यातील लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणून जैसलमेर ओळखले जाते. येथील वाळवंटात तुम्हाला मुलांना घेऊन उंट आणि हत्तीची सवारी करता येईल. येथे तुम्ही तंबूमध्ये ही राहू शकता. जैसलमेरला गेल्यावर तेथील आसपासची प्रेक्षणीय स्थळे जसे की, पटवों की हवेली, गडीसर तलाव आणि खाबा किल्ला यांसारख्या ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकता. (jaisalmer)

हिमाचल प्रदेश

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कुठेतरी उंच पर्वतीय भागात आणि थंड हवेच्या ठिकाणी जायला लोकांना आवडते. तुम्हाला ही थंड हवेच्या ठिकाणी जायचे असेल, तर हिमाचल प्रदेश हे राज्य त्यासाठी बेस्ट आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला १० हजार रूपये मोजावे लागतील. येथील वातावरण थंड आहे, त्यामुळे, कुटुंबासोबत तुम्हाला येथे वेळ घालवताना मजा येईल. हिमाचल प्रदेशात भेट देण्यासाठी अनेक चांगली ठिकाणे आहेत. (Himachal Pradesh)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: धक्कादायक! पुण्यात हॉस्पिटलसमोर सापडला जिवंत बॉम्ब; क्षणार्धात परिसर सील, सात तासांचा टाइमर सेट

Donald Trump: चीनमध्ये उतरताच डोनाल्ड ट्रम्प यांचा अपमान! स्वागतासाठी शी जिनपिंग गैरहजर; ड्रॅगनकडून अमेरिका-चीन संबंधांबाबत नवा संकेत?

Prateek Yadav: प्रतीक यादवच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला पल्मोनरी थ्रोम्बोएम्बोलिझम काय? डॉक्टरला बोलावण्याचीही संधी मिळाली नाही...

RCB VS KKR LIVE: अजिंक्य रहाणेने वर्ध्याच्या पोट्ट्याला दिली पदार्पणाची कॅप... जाणून घ्या कोण आहे सौरभ दुबे? ६ फूट ५ इंच उंचीचा गोलंदाज

"नजरेत धग अन् रग..."ओळखलंत का 'रंगी'ला? १९ जूनला होतंय 'घबाडकुंड'चं दर्शन!

SCROLL FOR NEXT