Summer Travel Places esakal
टूरिझम

Summer Travel Places : कडक उन्हाळ्यात कूल व्हायचंय? तर बॅग भरो निकल पडो, याहून बेस्ट ऑप्शन शोधूनही नाही सापडणार

Summer Travel Places : मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत मुलांच्या परीक्षा संपतात आणि मुलांना सुट्ट्या लागतात. मग, उन्हाळी सुट्टीत फिरायला जाण्याचे प्लॅन्स आखले जातात.

Monika Lonkar –Kumbhar

Summer Travel Places : मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत मुलांच्या परीक्षा संपतात आणि मुलांना सुट्ट्या लागतात. मग, उन्हाळी सुट्टीत फिरायला जाण्याचे प्लॅन्स आखले जातात. खास करून या कडक उन्हापासून कुठेतरी दूर आणि थंडावा मिळेल अशा ठिकाणांची निवड केली जाते. भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत. जिथे तुम्हाला कडक उन्हापासून आराम मिळेल आणि भरपूर थंडावा मिळेल.

यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही जर कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर, हा लेख शेवटपर्यंत वाचा. कारण, आज आम्ही तुम्हाला भारतातील काही अशा ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. जिथे तुम्हाला भरपूर थंडावा मिळेल आणि तुमची समर ट्रीप मस्त होईल. चला तर मग जाणून घेऊयात त्या ठिकाणांबद्दल.

मिरिक

पश्चिम बंगाल या राज्यात हे सुप्रसिद्ध हिलस्टेशन स्थित आहे. तिथल्या सर्वात सुंदर हिलस्टेशन्समध्ये या मिरिकचा पहिला क्रमांक लागतो. असंख्य पर्यटकांचे हे आवडीचे ठिकाण आहे. तुम्ही या ठिकाणी कौटुंबिक सहलीसाठी जाऊ शकता. विशेष म्हणजे उन्हाळ्यातही येथील तापमान वीस अंशांच्या वर जात नाही. येथील निसर्ग, डोंगराचा परिसर, धबधबे आणि इतर अनेक पर्यटनस्थळांना तुम्ही भेट देऊ शकता.

कुन्नूर

कुन्नूर हे ठिकाण तामिळनाडू राज्यात स्थित आहे. हे एक लोकप्रिय हिलस्टेशन आहे. येथील मनमोहक निसर्ग आणि शांत वातावरणाच्या तुम्ही प्रेमात पडाल, यात काही शंका नाही. त्यामुळे, देश-विदेशातील असंख्य पर्यटक निवांत वेळ घालवण्यासाठी या ठिकाणाला भेट देतात. येथील चहाचे मळे, निलगिरी रेल्वे आणि उंच पर्वत तुम्हाला भुरळ घालतील. उन्हाळ्यात या ठिकाणी तुम्ही मस्त फिरू शकता.

चेरापुंजी

देशात ज्या ठिकाणी पावसाळ्यात सर्वाधिक पाऊस पडतो, ते ठिकाण म्हणजे चेरापुंजी होय. ईशान्य भारतातील हे एक सुप्रसिद्ध ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्ही उन्हाळ्यात नक्कीच भेट देऊ शकता. शिवाय, उन्हाळ्यात येथील वातावरण थंड असते. उन्हाळ्यात येथील तापमान १५ ते २३ अंशांच्या दरम्यान असते. येथी सुंदर परिसर, निसर्ग आणि धबधबे तुम्हाला आवडतील, यात काही शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रात पाऊस उघडीप देणार; पुढील ४ दिवसांचा हवामान अंदाज आला,पुण्याला मात्र ऑरेंज अलर्ट

विशेष : अर्थशास्त्र : भविष्यातील रोजगाराच्या अमर्याद संधी

मोठी बातमी! सोलापूर-पुणे हायवेवरील ६० मीटर अंतरातील ढाबे, हॉटेल ६ महिन्यांत हटणार; ‘एनएचएआय’कडून नोटिसा, ६ महिन्यांत ४२६ जणांचा अपघाती मृत्यू, वाचा...

Ghatkopar landslide : घाटकोपरमध्ये दरड कोसळून दोघांचा मृत्यू; ५-६ घरांवर दरड, अनेकजण अडकल्याची भीती

Dahi-Paneer Kebab: पोटही भरेल, चवही खुलून येईल! कमी तुपात बनवा कुरकुरीत दही-पनीर कबाब; नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी

SCROLL FOR NEXT