Jungle Trekking esakal
टूरिझम

Jungle Trekking : जंगलात ट्रेकिंग करायचंय? मग, भारतातील ‘या’ ठिकाणांना नक्की द्या भेट

Jungle Trekking : आपल्या आजूबाजूला असे कितीतरी लोक असतात की, ज्यांना अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हिटीज करायला आवडतात.

Monika Lonkar –Kumbhar

Jungle Trekking : आपल्या आजूबाजूला असे कितीतरी लोक असतात की, ज्यांना अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हिटीज करायला आवडतात. या लोकांना निसर्गाच्या सानिध्यात जायला आवडते. निसर्गात फिरायला गेल्यानंतर काहीतरी वेगळा आणि भन्नाट अनुभव काहींना घ्यायला आवडतो. जसे की, जंगलात ट्रेकिंगला जाणे, किंवा एखाद्या उंच किल्ल्यावर चढाई करणे इत्यादी गोष्टी करायला काही लोकांना आवडते.

पर्वतावर किंवा किल्ल्यावर ट्रेकिंग सर्वजण करतात. मात्र, जंगलात ट्रेकिंग करायला फार मोठे धाडस लागते? जर तुम्हाला ही जंगलात ट्रेकिंग करण्याची आवड असेल तर आजचा हा लेख शेवटपर्यंत वाचा. कारण, आज आम्ही तुम्हाला भारतातील अशाच काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. जिथे तुम्ही जंगलात ट्रेकिंग करू शकता. कोणती आहेत ही ठिकाणे? चला तर मग जाणून घेऊयात.

कान्हा नॅशनल पार्क

मध्यप्रदेशात स्थित असलेले कान्हा नॅशनल पार्क हे खरे तर भारतातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान आहे. मात्र, जंगल ट्रेकिंगसाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे. या जंगलात सस्तन प्राण्यांच्या तब्बल २२ प्रजाती आहेत. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना वन्यजीवांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पहायला आवडते.

भारतातील सर्वोत्तम जंगल ट्रेकिंग ठिकाणांपैकी एक म्हणून हे कान्हा नॅशनल पार्कचा ओळखले जाते. या घनदाट जंगलातून ट्रेक करायला, साधारणपणे २-३ तास लागतात. ऑक्टोबर ते जूनच्या अखेरपर्यंत या ठिकाणी भेट देणे सर्वोत्तम आहे. (Kanha National Park Madhya Pradesh)

कुंजखरक ट्रेक

हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या कॉर्बेटजवळील पंगोटपासून हा कुंजखरक ट्रेक सुरू होतो. हे जंगल ट्रेकिंगचे ठिकाण उत्तराखंड राज्यात स्थित आहे. ज्यांना निसर्गाच्या सानिध्यात निवांत वेळ घालवायचा आहे, ज्यांना अधिक गर्दी नको आहे. त्यांच्यासाठी हा जंगल ट्रेक बेस्ट पर्याय ठरू शकतो.

या ठिकाणी ट्रेकिंग करताना तुम्हाला उंच पाईन झाडे दृष्टीस पडतील. त्यासोबतच कोसी नदी वाटेत भेटेल, ती पार करून तुम्हाला पलिकडे जावे लागेल. भारतातील जंगल ट्रेकिंगसाठी तुम्ही या ठिकाणाची निवड करू शकता. ऑक्टोबर ते एप्रिल हा येथे भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी मानला जातो. (Kunjkharak Trek)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT