टूरिझम

लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करताय? ही ठिकाणं आहेत बेस्ट

सकाळ डिजिटल टीम

लग्नाचा पहिला वाढदिवस लक्षात राहावा यासाठी कपल्स वेगवेगळ्या योजना तयार करत असतात. लग्नात आधीच खूप खर्च झालेला असतो. त्यात वर्षभर काहीना काही मोठे खर्च होतातच. अशावेळी कमी बजेटमध्ये जर फिरायला जायचे असेल तर काही ठिकाणं आहेत जेथे तुम्ही फिरायचा प्लॅन करु शकता.

उदयपूर - येथे तुम्हाला सुंदर तलाव आणि भव्य टेकड्या पाहायला मिळतात. लग्नाचा वाढदिवस विशेष करायचा असेल, तर तुम्ही तलावाजवळ जागा घेऊन तिथे राहू शकता. येथे जोडीदारासोबत शांततेत वेळ घालवणे फार रोमेंटिक असेल.
मुन्नार- हे शांत हिल स्टेशन खूप सुंदर आहे. इथल्या निसर्गाचा आनंद तुम्ही आवडीच्या माणसाबरोबर इथला आनंद घेऊ शकता. इथे तुम्ही लग्नाचा वाढदिवस छान साजरा करू शकता. येथे तुम्ही चहा, कॉफीच्या मळ्यात फिरू शकता.
पोंडिचेरी (पुडुचेरी)- लग्नाच्या वाढदिवसासाठी हे उत्तम ठिकाण आहे. इथल्या प्रत्येक गोष्टीचा तुम्ही आनंद घेऊ शकता. येथे तुम्ही रस्त्यावर फिरू शकता, समुद्राजवळ राहू शकता. फ्रेंच पदार्थांचा आनंद घेऊ शकता.
कोवलम- जर तुम्हाला लग्नाचा वाढदिवस समुद्रकिनारी साजरा करायचा असेल तर ही अतिशय चांगली जागा आहे. स्वच्छ पाणी आणि ताडाची झा़डे मन प्रसन्न करतील. गर्दीपासून दूर जात इथे जोडीदारासोबत आनंदात वेळ घालवता येईल.
कुमारकोम- तुम्हाला हिरवागार निसर्ग पाहायचा असेल तर कुमारकोमला जा. येथे तुम्ही खूप आराम करू शकता. तसेच खूप फोटो काढू शकता. जोडीदारासोबत शांत ठिकाणी जायचा विचार करत असाल तर ही जागा अत्यंत योग्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Darshan: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार; ऑडिओ क्लिप व्हायरल, अधिक मास सुरू होताच पंढरपुरात खळबळ..

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

SCROLL FOR NEXT