Tourism became expensive Esakal
टूरिझम

Tourism: फिरायला जाणं महागलं; इंधनदरवाढीचा पर्यटनाला फटका

कोविड निर्बंध शिथिल झाल्याने देशभरात पर्यटन व्यवसाय रूळावर येत असताना इंधनाची दरवाढ झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोविड निर्बंध शिथिल झाल्याने देशभरात पर्यटन व्यवसाय रूळावर येत असताना इंधनाची दरवाढ झाली आहे. याचा फटका पर्यटकांना बसत आहे. खाद्यान्न महागल्याने आणि स्वच्छतेच्या नियमावलीमुळे सहलीसाठी नागरिकांना २० टक्के अतिरिक्त रक्कम मोजावी लागत आहे.

दोन वर्षापासून घरात बसून असलेले पर्यटकांमध्ये (Tourists) उत्साह अधिक असला तरी सहलीच्या दरात वाढ झाल्याने काहींनी आपले बजेट बिघडणार असल्याने सहलीला जाण्याचे बेत रद्द केले आहेत. सध्या ६० टक्के व्यवसाय सुरु झालेला आहे. विदर्भातील सर्वच एजंट आता पर्यटकांच्या सेवेत पूर्णपणे बिझी झालेले आहेत. (Tourism: Going for a walk is expensive; Fuel price hike hits tourism)

पूर्वी सर्वसामान्यपणे काश्मीरला (Kashmir) जाण्यासाठी प्रति व्यक्ती २० हजार रुपये खर्च येत होता तो आता २५ हजारांवर गेला आहे. तरीही हॉटेलचे बुकिंग मिळणे अवघड झालेले आहे. गेल्या दोन वर्षापासून सर्वाधिक फटका बसलेल्या या व्यवसायाला आता चांगले दिवस येऊ लागले आहेत.

काश्मीरमधील हॉटेल्स १०० टक्के आरक्षित-

पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून समजल्या जाणाऱ्या काश्मीरमधील हॉटेल्स, रिसोर्ट आणि होम-स्टे एप्रिल आणि मे महिन्यापर्यंत १०० टक्के आरक्षित झाले आहेत. त्यामुळे अनेक पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.

आंतरराष्ट्रीय पर्यटन बंदच-

देशांतर्गंत पर्यटनाला प्रारंभ झाला असला तरी जागतिक पर्यटन बंदच आहे. त्यामुळे पर्यटक आता निसर्गसंपन्न असलेल्या जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, लडाख, मेघालय, मणिपूर ही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे वळले आहेत.

''कोरोनाचे निर्बंध देशभरात काढण्यात आल्याचे जाहीर करताच पर्यटनाकडे जाणाऱ्यांचा कल वाढलेला आहे. त्यामुळे देशांतर्गत पर्यटनस्थळांची बुकिंग जोमात होत आहे. अनेक राज्यातील हॉटेल आताच हाऊसफुल्ल झालेले आहेत. तसेच इंधनदरासह इतरही दरवाढीने सहलीच्या शुल्कातही १५ ते २० टक्के वाढ झालेली आहे.''असं टुरिझम आंत्रप्रेन्योर्स नेटवर्कचे महाराष्ट्र अध्यक्ष विश्वनाथ उपाध्याय यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik : भावाच्या नावावर बोगस मतदानाचा प्रयत्न, बनावट आधार कार्डमुळे उघड; एकाला घेतलं ताब्यात

Vijay Hazare Trophy: रोहित शर्मा दोन सामन्यांसाठी संघात, वाचा कोणाच्या नेतृत्वाखाली खेळणार; विराट कोहलीचेही टीममध्ये नाव

Pune Municipal Elections : पुण्यात महापालिका निवडणुकीपूर्वी धक्कादायक वळण! भाजपचा राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना जोरदार झटका

Mumbai Municipal Corporation Election : मोट बांधण्याची मविआची हालचाल; मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढण्यासाठी प्रयत्न

Kolhapur Election : कोल्हापूर–इचलकरंजी महापालिकेत महायुतीवर शिक्कामोर्तब; भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र, निवडणूकची रणधुमाळी सुरू

SCROLL FOR NEXT