travel food tips and tricks Sakal
टूरिझम

ट्रीपमध्ये खाण्यापिण्याच्या 'या' गोष्टींची काळजी घेतलीच पाहिजे, अन्यथा होतील गंभीर परिणाम

Travel Food Tips and Tricks : सहलीदरम्यान आजारी पडायचे नसेल तर कोणत्या पदार्थांचं सेवन करावे आणि कोणते पदार्थ खाणे टाळावे? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

सकाळ डिजिटल टीम

प्रवासादरम्यान ठिकठिकाणी भेट देताना, लोक तिथल्या चविष्ट खाण्यापिण्या योग्य पदार्थाचा देखील आनंद घेत असतात. यामुळे तुमच्या व्हेकेशनची मजा द्विगुणित होते, असे म्हणायला हरकत नाही. आता काही लोक प्रवास करतात, कारण त्यांना चवदार पदार्थ खायला आवडतात. ट्रॅव्हलर असण्यासोबतच ते फूडी देखील असतात.

पण नॉर्मल प्रवास करणारे बहुतेक लोक जेवणाशी संबंधित काही अशा चुका करतात, की ज्यामुळे सहलीची मजाच जाते. प्रवासात जेवणाशी संबंधित काही छोट्यामोठ्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.

इथे आम्ही तुम्हाला काही फूड टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या प्रवासाची किंवा सहलीची मजा खराब होणार नाही, तर ती आणखीनच वाढेल. जर तुम्ही प्रवासाचा विचार करत असाल तर या फूड टिप्स नक्की लक्षात ठेवा.

कंटाळा न करता खावे

प्रवासादरम्यान शरीरास आवश्यक असणारा कॅलरीयुक्त आहार घेणं आणि त्याचे नियम पाळणे तेवढं सोपं नसतं. पण आपण जे पदार्थ खात आहोत ते योग्य आहेत की नाही? हे आपण निश्चितपणे लक्षात घेऊ शकतो. जास्त खाणं किंवा चवीसाठी काहीही खाल्ल्याने आरोग्य बिघडू शकते.

पाणी पिण्याची सवय

प्रवासात लोक पाणी पिणे टाळतात, कारण त्यांना वारंवार लघुशंकेच्या समस्येचा सामना करावा लागतो. प्रवासात पाणी प्यायल्यास तुम्ही डिहायड्रेशनच्या समस्येपासून वाचू शकता. शिवाय त्वचेशी संबंधित समस्याही उद्भवणार नाहीत.

पॅकेट फूड खाऊ नका

बहुतेक प्रवासी चिप्स, चिवडा यासारखे पाकिटबंद पदार्थ आवडीने खातात. या पदार्थांमुळे जीभेचे चोचले पुरवतात. पण यामुळे पचनाशी संबंधित समस्याही निर्माण होऊ शकतात.

चहा किंवा कॉफी कमी प्या

सहलीमध्ये लोक ठिकठिकाणी थांबून चहा किंवा कॉफी पितात. आलू पराठा आणि कुल्हड चहा हा प्रत्येकाचाच आवडता मेन्यू. पण कॅफीनयुक्त पदार्थांच्या अतिसेवनामुळे पोट फुगणे, पोटदुखी तसंच आरोग्याशी संबंधित अन्य समस्याही उद्भवू शकतात. तसंच चहा किंवा कॉफीमुळेही डिहायड्रेशनची समस्याही सुरू होते.

फळे खा

प्रवास करताना प्लास्टिकच्या पाकिटांमधील खाद्यपदार्थ खाणे टाळा आणि त्याऐवजी ताजी फळे खा. फळांच्या सेवनामुळे पोटाचे आरोग्य निरोगी राहते आणि शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होत नाही. प्रवासातही हंगामी फळे खाण्याचा शक्यतो जास्तीत जास्त प्रयत्न करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

SCROLL FOR NEXT