Travel Tips esakal
टूरिझम

Travel Tips : हिवाळ्यात हवीय उन्हाळ्याची मज्जा ?या हॉट स्प्रिंग्स डेस्टिनेशनला नक्की भेट द्या

भारतात तुम्हाला उन्हाळ्यात थंडी आणि हिवाळ्यात उष्णता जाणवू शकते

सकाळ डिजिटल टीम

Travel Tips : जगात भारताला incredible इंडिया म्हणून ओळखलं जातं कारण इथली विविधता. अनेक भाषा पंथ संस्कृती यात विविधता तर आहेच शिवाय निसर्ग हवामान यात सुद्धा प्रचंड वैविध्य पाहावयास मिळते. उदाहरणच बघायचं झालं तर भारतात तुम्हाला उन्हाळ्यात थंडी आणि हिवाळ्यात उष्णता जाणवू शकते. उत्तर भारतासह देशातील बहुतांश भागात थंडीने कहर सुरूच ठेवला आहे आणि पण इथे असेही काही ठिकाणे आहेत जिथे तुम्ही उन्हाळ्याची मज्जा घेऊ शकता.

भारतातील हिवाळ्यात उष्णता अनुभवण्यासाठी तुम्ही राजस्थानच्या भागात जाऊ शकता, परंतु इथे आम्ही हॉट स्प्रिंग्स डेस्टिनेशन बद्दल बोलत आहोत. हॉट स्प्रिंग्स म्हणजे तलाव किंवा गरम पाण्याचा झरा, ज्यामध्ये आंघोळ करण्याची मजाच वेगळी असते. ही आहेत भारतातील हॉट स्प्रिंगची ठिकाणे...

१. पनामिक, नुब्रा व्हॅली :

लेह हा भारतातील सर्वात थंड प्रदेश आहे परंतु तुम्ही येथे असलेल्या Panamik नावाच्या हॉट स्प्रिंग डेस्टिनेशनला भेट देऊ शकता. हे सुमारे 10442 फूट उंचीवर आहे आणि येथील दृश्ये मन मोहून टाकतात

२. खीर गंगा गरम पाण्याचा झरा :

हिमाचल प्रदेशच्या कुशीत वसलेल्या या गरम पाण्याच्या झऱ्याला भेट देण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. तो सध्या कुल्लीच्या आखरा बाजारात आहे. हिमाचल प्रदेशातील हे प्रसिद्ध हॉट स्प्रिंग डेस्टिनेशन आहे.

३. गौरीकुंड :

लोक याला केदारनाथचे गौरीकुंड म्हणूनही ओळखतात. मंदाकिनी नदीवरील हे कुंड समुद्रसपाटीपासून २०४० मीटर उंचीवर आहे. गौरीकुंड हे नैसर्गिक थर्मल स्प्रिंग म्हणूनही प्रसिद्ध आहे.

४. मणिकरण साहिब :

सुंदर दऱ्यांमध्ये वसलेले मणिकरण साहिब धार्मिक दृष्ट्याही प्रचंड प्रसिद्ध आहे. या हॉट स्प्रिंग डेस्टिनेशनमध्ये बाहेर पडणारे गरम पाणी अनेक खनिजांनी भरलेले आहे. त्यात सल्फरचे प्रमाण सर्वाधिक असते. या पवित्र पाण्यात डुंबल्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT