Visa Free Travel Sakal
टूरिझम

Visa-Free Travel: श्रीलंकेनंतर आता 'या' देशांनी दिली व्हिसाची सूट; यंदा दिवाळीची सुट्टी इथेच प्लॅन करू शकता...

गेल्या आठवड्यात, श्रीलंका सरकारने ३१ मार्च २०२४ पर्यंत भारतीयांसाठी व्हिसा-मुक्त प्रवासाला मान्यता दिली.

वैष्णवी कारंजकर

थायलंडच्या पंतप्रधान स्रेथा थाविसिन यांच्या मते, भारत आणि तैवान सरकारच्या व्हिसा-माफीची घोषणा केली आहे. कोरोना महामारीनंतर अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्याचा आणि पर्यटन उद्योगाला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न म्हणून ही घोषणा करण्यात आली आहे.

वृत्तानुसार, ही व्हिसा सूट श्रीलंकेप्रमाणे काही महिन्यांसाठी लागू केली जाईल.पर्यटन विभागाचे प्रवक्ते चाय वचारोंके यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीयांना ३० दिवसांसाठी व्हिसाशिवाय थायलंडमध्ये प्रवेश दिला जाईल. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, १० नोव्हेंबर २०२३ ते १० मे २०२४ पर्यंत भारतीयांना व्हिसाशिवाय थायलंडला जाण्याची परवानगी दिली जाईल.

भारतीय आणि चिनी पर्यटकांव्यतिरिक्त, थायलंड सरकार मलेशियातील पर्यटकांसाठी प्रवास निर्बंध कमी करण्यासाठीही काम करेल. मलेशिया, चीन आणि दक्षिण कोरियाच्या नंतर भारत हा थायलंडचा पर्यटनाचा चौथा सर्वात मोठा स्त्रोत आहे.

गेल्या आठवड्यात, श्रीलंका सरकारने ३१ मार्च २०२४ पर्यंत भारतीयांसाठी व्हिसा-मुक्त प्रवासाला मान्यता दिली. या यादीत भारतासह, श्रीलंकेने आता चीन, रशिया, मलेशिया, जपान, इंडोनेशिया आणि थायलंड या देशांना व्हिसामुक्त प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. २०२३ च्या हेन्ली पासपोर्ट निर्देशांकानुसार, भारतीय ५७

ठिकाणांवर व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात. भूतान, बार्बाडोस, एल साल्वाडोर, ग्रेनाडा, हाँगकाँग, मालदीव आणि सेशेल्स ही यापैकी काही ठिकाणे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZIM vs AFG : झिम्बाब्वेचा कसोटी इतिहासातील सर्वात मोठा विजय! Blessing Muzarabani ने मोडला मोहम्मद सिराजचा विक्रम

Mehul Choksi: मेहुल चोक्सीला भारतात आणणार! मुंबईतील 'या' तुरूंगात होणार रवानगी, कशी असणार सुविधा?

Siddaramaiah Latest News : सिद्धरामय्या घेताय राजकारणातून निवृत्ती? ; मुलाच्या विधानाने कर्नाटकातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

Uganda Accident: भयंकर! ओव्हरटेक करण्याचा बस चालकाचा प्रयत्न अन्...; भीषण अपघातात ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक गंभीर

Latest Marathi News Live Update : मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर टायगर ग्रुपच्या कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी

SCROLL FOR NEXT