World Heritage Day Sakal
टूरिझम

जागतिक वारसा स्थळांच्या यादीत भारतातील कोणती ठिकाणं आहेत माहितीये?

ज्या स्थळांना सांस्कृतीक आणि भौगोलिकदृष्ट्या प्रतिष्ठा आणि महत्त्व प्राप्त झालेले असते त्या स्थळांचा सामावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केला जातो.

दत्ता लवांडे

आज जागतिक वारसा दिन. ज्या स्थळांना सांस्कृतीक आणि भौगोलिकदृष्ट्या प्रतिष्ठा आणि महत्त्व प्राप्त झालेले असते त्या स्थळांचा सामावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केला जातो. जगातील वारसा स्थळांची यादी तयार करण्यची जबाबदारी जागतिक वारसा स्थान समितीवर असते. जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सामावेश झालेल्या स्थळांना युनेस्कोकडून संरक्षणासाठी अनुदान दिले जाते.

संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) ही सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारशासाठी उत्कृष्ट वैश्विक मूल्य असलेल्या जागतिक वारसा स्थळांना नियुक्त करते. ही यादी १९७२ मध्ये स्थापन झालेल्या युनेस्को जागतिक वारसा अधिवेशनावर स्वाक्षरी करणाऱ्या देशांनी नामांकित केलेल्या स्थळांमधून तयार केली जाते.

सध्या जगभरातील १६७ देशांमध्ये एकूण ११०० जागतिक वारसा स्थाने अस्तित्वात असून त्यांपैकी १८३ नैसर्गिक स्थळे, ७२५ सांस्कृतिक स्थळे व २८ मिश्र स्वरूपाची स्थळे आहेत. त्यापैकी इटलीमध्ये सर्वाधिक (४७) तर भारतामध्ये ४० जागतिक वारसा स्थाने आहेत. या स्थळामध्ये किल्ले, लेण्या, भौगोलिक महत्त्व प्राप्त झालेली ठिकाणे, सांस्कृतिक अशा ४० ठिकाणांचा सामावेश आहे. या स्थळांमध्ये सर्वांत अजिंठा लेणी या ठिकाणाचा सर्वांत आधी यादीत सामावेश झाला असून तेलंगणा राज्यातील रामप्पा मंदीराचा शेवटी म्हणजे २०२१ मध्ये सामावेश झाला आहे.

जागतिक वारसा स्थळांच्या यादीत असलेले भारतातील ठिकाणे

१) अजिंठा लेणी

२) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)

३) चर्चगेट आणि फोर्ट परिसरातील गॉथिक शैलीतील इमारती

४) आग्रा किल्ला

४) बिहारमधील नालंदा, नालंदा महावीराचे पुरातत्व स्थान

६) सांची येथील बौद्ध स्मारके

७) चंपानेर पावागढ पुरातत्व उद्यान

८) चर्च आणि गोवा कॉन्व्हेंट्स

९) एलिफंटा लेणी

१०) एलोरा लेणी

११) फतेपीर सिक्री

१२) ग्रेट लिव्हिंग चोल मंदिरे

१३) हंपी येथील स्मारकांचा गट

१४) महाबलीपूरम येथील स्मारकांचा गट

१५) पट्टडकल येथील स्मारकांचा गट

१६) राजस्थाचे हील किल्ले

१७) अहमदाबाद ऐतिहासिक शहर

१८) हुमायुंची थडग, दिल्ली

१९) जयपूर शहर

२०) खजुराहो येथील स्मारकांचा ग्रुप

२१) बोधगया येथील महाबोधी मंदीर

२२) माउंटन रेल्वे

२३) कुतुब मिनार आणि त्याची स्मारके

२४) राणी की वाव, गुजरात, पाटण

२५) रेड फोर्ट कॉम्प्लेक्स

२६) भीमबेटकाचे रॉक आश्रयस्थान

२७) सूर्य मंदीर, कोणार्क

२८) ताजमहल

२९) आर्किटेक्स्चर वर्क ऑफ ली कॉर्ब्यूसीअर, आधुनिक चळवळीचे योगदान

३०) जंतर मंतर,जयपूर

३१) काकतीय रुद्रेश्वर, रामप्पा मंदीर, तेलंगणा

३२) धोलावीरा, गुजरात

३३) काझीरंगा नॅशनल पार्क

३४) केवलादेव नॅशनल पार्क

३५) नंदादेवी नॅशनल पार्क आणि व्हॅली

३६) मानस वर्ल्डलाईफ सँच्युरी

३७) सुंदरबन नॅशनल पार्क

३८) पश्चिम घाट

३९) ग्रेट हिमालय नॅशनल पार्क

४०) खांगचेडझोगा नॅशनल पार्क, सिक्कीम

ही भारतातील स्थळे जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आहेत. अजूनही काही स्थळांचे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहेत. लवकरच महाराष्ट्रातील रायगड, राजगड आणि तोरणा यांसहित १४ किल्ले आणि काही कातळशिल्पांच्या नावासह युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचं महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्व खात्याच्या संचालकांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

विहानला खेळायला जायचंय, तो येईल; बसवर झाड कोसळून मुलाचा मृत्यू, आई पाहतेय वाट, घरासमोरच घडली दुर्घटना

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

SCROLL FOR NEXT