16 Years 9 Months & 5 Days Delhi Police Congratulates India In Unique Style On Winning 2nd T20 World Cup Title  
Trending News

T20 World Cup:16 वर्ष, 9 महिने अन् 5 दिवस...भारताच्या विजयानंतर दिल्ली पोलिसांचे हटके ट्विट; दिला खास सल्ला

भारताच्या विजयानंतर दिल्ली पोलिसांचे हटके ट्विट व्हायरल.

सकाळ डिजिटल टीम

टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (29 जून) बार्बाडोसला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात झाला. या सामन्यात भारतीय संघाने 7 धावांनी विजय मिळवत दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरले. तब्बल 17 वर्ष 9 महिने पाच दिवसांनी भारताने दुसऱ्यांदा या विजेतेपदाला गवसणी घातली. भारताच्या या विजयानंतर संघावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान दिल्ली पोलिसांनी हटके ट्विट करत सर्वांचे लक्ष वेधलं आहे. (16 Years 9 Months & 5 Days Delhi Police Congratulates India In Unique Style On Winning 2nd T20 World Cup Title )

दिल्ली पोलिसांनी भारतीय संघाच्या विजयानिमित्त ट्विटरवर एक पोस्ट केली जी सध्या चर्चेत आहे.

काय म्हटले आहे पोस्टमध्ये?

'आपण सर्वांनी 16 वर्षे 9 महिने 5 दिवस (52,70,40,000 सेकंद) भारताने आणखी एक #T20WorldCup जिंकण्यासाठी वाट पाहिली आहे. ट्रॅफिक सिग्नलवरही थोडा धीर धरूया. एकाद्या चांगल्या क्षणाची वाट पाहिली पाहिजे. काय म्हणता? हार्दिक अभिनंदन, #TeamIndia.'

असं हटके ट्विट करत दिल्ली पोलिसांनी वाहनचालकांना खास संदेश वजा सल्ला दिला आहे.

दिल्ली पोलिसांच्या या ट्विटनंतर त्यांचे सोशल मीडियावर कौतुक होताना दिसत आहे. एका यूजरने लिहिले, 'व्वा, तुमची सोशल मीडिया टीम अप्रतिम आहे. चांगल्या गोष्टींना वेळ लागतो हे खरे आहे. आणखी एका युजरने म्हटले, 'दिल्ली पोलिस, तुमचे ट्विट वेगळ्या स्तराचे आहेत. खुप छान.'

यापूर्वी भारतीय संघाने एमएस धोनीच्या नेतृत्वात खेळताना २००७ साली पहिल्यांदा टी२० वर्ल्ड कप जिंकला होता. टी२० वर्ल्ड कप दुसऱ्यांदा जिंकणारा भारत तिसरा संघ ठरला. यापूर्वी असा कारनामा वेस्ट इंडीज आणि इंग्लंडने केला आहे. वेस्ट इंडीजने २०१२ आणि २०१६ साली टी२० वर्ल्ड कप जिंकला. तसेच इंग्लंडने २००९ आणि २०२२ मध्ये टी२० वर्ल्ड कपला गवसणी घातली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT