Bengaluru Scooter Thrown From Bridge Esakal
Trending News

Bengaluru Scooter: रिल्ससाठी स्टंट... लोकांनी थेट पुलावरून फेकून दिली बाईक, व्हिडिओ व्हायरल

Bengaluru Scooter Thrown From Bridge: दरम्यान या लोकांनी पुलावरून स्कूटर फेकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात संतापलेले लोक पूलावरून स्कूटर खाली फेकताना दिसत आहेत.

आशुतोष मसगौंडे

सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी तसेच इन्स्टाग्राम रीलसाठी लोक आज काहीही करायला लागले आहेत. सोशल मीडियावरील काही लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी ते जीव धोक्यात घालून वेगवेगळे स्टंट करतात. असे करताना अनेकांनी जीव गमावल्याच्याही घटना समोर आल्या आहेत.

दरम्यान अशीच एक घटना बंगळुरूमध्ये घडली आहे. तिथे रस्त्याच्या मधोमध स्कूटरवर जीवघेणा स्टंट करताना लोकांनी एका युवकाला पकडले. तेव्हा लोकांनी हे प्रकरण हातात घेतले आणि त्याला धडा शिकवण्याचे ठरवले.

बंगळुरूमध्ये काही लोकांनी रस्त्यावर इंस्टाग्राम रीलसाठी व्हिडिओ बनवणाऱ्या युवकाला वेगवान स्कूटरवर धोकादायक स्टंट करताना पकडले. यावेळी संतापलेल्या लोकांनी स्टंट करणाऱ्या तरुणाची स्कूटर थेट पूलावरून खाली फेकली. ही स्कूटर खाली पडल्यानंतर त्याचे अनेक तुकडे पाहायला मिळाले.

दरम्यान या लोकांनी पुलावरून स्कूटर फेकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात संतापलेले लोक पूलावरून स्कूटर खाली फेकताना दिसत आहेत.

कुठे घडले?

ही घटना कर्नाटकातील तुमाकुरु राष्ट्रीय महामार्गावरील आहे. जिथे एक तरुणी त्याच्या स्कूटरवर रील्ससाठी स्टंट करत अमर्याद वेगाने स्कूटर चालवत होता.

दरम्यान हा स्टंट करताना त्याचा जीव तर धोक्यात घातलाच होत पण इतर स्वार आणि पादचाऱ्यांचा जीवही धोक्यात घातला. त्याच्या स्टंटबाजीमुळे संतप्त झालेल्या जमावाने स्कूटर पुलावरून फेकून दिली.

नेलमंगळा पोलिसांनी स्कूटर जप्त करून स्टंट करणाऱ्या तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिकारी सांगितले की सीसीटीव्ही फुटेज आणि दुचाकीचे तपशील तपासत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या तरुणांचे पालक उत्तर बेंगळुरूच्या मथिकेरे आणि यशवंतपूर भागात राहतात.

बेंगळुरू ईशान्य वाहतूक पोलिसांनी 15 ऑगस्ट रोजी विशेष मोहीम राबवून विमानतळ रोडवर स्टंट करणाऱ्या 44 लोकांना अटक केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बेंगळुरूमधील काही तरुणांसाठी हे स्टंट करण्यासाठी महामार्गावर जाणे सामान्य झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Labour Law: पगार, भत्ते आणि ग्रॅच्युइटी आता नवीन कामगार संहितेत कशी मोजली जाणार? कामगार मंत्रालयाकडून मसुदा नियम जाहीर

Viral Video: अरे व्वा! शिक्षकाने स्वतःच्या पैशांनी मुलांना दिला विमान प्रवासाचा अनुभव, व्हिडिओ पाहून नेटकरी भावुक

Vande Bharat Sleeper Train Route नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशातील पहिल्या 'वंदे भारत स्लीपर ट्रेन'चा मार्ग झाला जाहीर!

School Rules: शिक्षकांना करता येणार नाही विद्यार्थ्यांच्या रील, शिक्षण विभागाची नवी नियमावली

Latest Marathi News Live Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अंधेरीत मनसेला मोठे खिंडार

SCROLL FOR NEXT