BUS Accident 
Trending News

VIDEO: भारतीय लष्कर नसतं तर भाविकांची बस दरीत कोसळली असती; पाहा थरारक व्हिडिओ

Pilgrims jump off moving bus: सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अनेक भाविक बसमधून बाहेर उड्या घेत असल्याचं दिसत आहे.

कार्तिक पुजारी

श्रीनगर- भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांमुळे मोठा अपघात होता होता राहिला आहे. अमरनाथ यात्रेला आलेल्या एका बसचे ब्रेक फेल झाले होते. बस अमरनाथ ते होशियारपूर येथे जात होती. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण, १० भाविक जखमी झाले आहेत. सर्व प्रवासी पंजाबचे होते. 'हिंदूस्तान टाईम्स'ने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अनेक भाविक बसमधून बाहेर उड्या घेत असल्याचं दिसत आहे. मात्र, सुरक्षा दलाच्या त्वरित प्रसिदासामुळे मोठा अपघात टळला आहे. राष्ट्रीय महामार्ग ४४ वरील रामबन जिल्ह्यातील ही घटना आहे. बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले होते.

अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, बसमध्ये ४० प्रवासी होते. ते अमरनाथच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन घेऊन ते पंजाबमधील होशियारपूर येथे जात होते. यावेळी बानीहालजवळ नाचलेना येथे चालकाला बसवर नियंत्रण ठेवता येत नव्हते, कारण बसचे ब्रेक फेल झाले होते. या दुर्घटनेत १० जण जखमी झालेत, यात सहा पुरुष, तीन महिला आणि एका मुलाचा समावेश आहे.

भाविक बसमधून उड्या घेत असल्याचं पाहून लष्कराच्या जवानांनी तात्काळ कृती केली. बस पुढे जाऊन दरीत पडण्याची शक्यता होती. अशावेळी जवानांनी बसच्या टायरखाली दगड ठेवण्याचं काम केलं. त्याचबरोबर रुग्णवाहिकेला तात्काळ पाचारण करण्यात आलं होतं. शिवाय जखमींना लगेच प्राथमिक उपचार देण्यात आले. पीटीआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

व्हिडिओमध्ये दिसतंय की, प्रवासी बसच्या मागच्या दरवाज्यातून उड्या मारत आहेत. त्यामागून सुरक्षा दलाचे जवान पळत आहेत. बस थांबवण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न केला जात असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT