Viral Video Sakal
Trending News

Viral Video : रिक्षाचालक अन् मांडीवर बसवलेला कुत्रा! 'देव याचं भलं करो'-नेटकऱ्यांची प्रार्थना

हा व्हिडिओ बंगळूर येथील असल्याचं सांगण्यात येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येकाच्या घरी मांजर किंवा कुत्रा असे पाळीव प्राणी असतात. काही लोकं कुत्र्यांना कपडे घालतात, गाडीत बसवून फिरायला घेऊन जातात, काहीजण मांजरांचा मेकअप करतात. पण त्यांचा त्यांच्या पाळीव कुत्र्यावर जीव असतो. सध्या अशाच एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तो आपल्या कुत्र्याला मांडीवर घेऊन जाताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका रिक्षाचालकाचा असून तो रिक्षा चालवत असताना आपल्या पाळीव कुत्र्याला मांडीवर बसवून घेऊन चालला आहे. तर सिग्नलला थांबला असता त्याच्या डोक्यावरून रूमाल फिरवतानासुद्धा दिसत आहे. तो त्याची लेकरासारखी काळजी घेताना पाहून नेटकरीसुद्धा भावूक झाले आहे.

दरम्यान, नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी "देवाने या रिक्षाचालकाचे भले करो, त्याला आयुष्यात ज्या गोष्टी हव्या आहेत त्या गोष्टी त्याला मिळो अशी देवाकडे प्रार्थना" अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

बंगळूरू शहरातील रस्त्याच्या सिग्नलवरील हा व्हिडिओ असल्याचा दावा नेटकऱ्यांनी केला आहे. इंस्टाग्रामवरील alka_itis या अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून आत्तापर्यंत ४ लाख २५ हजार लोकांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेवटच्या दिवशी PM मोदी आणि शहा आले, ४ मिनिटात कामकाज आटोपले; लोकसभा अनिश्चित काळासाठी तहकूब

Shaktipeeth Highway Protest : जयंत पाटील, राजू शेट्टी एकत्र! 'शक्तिपीठ' रद्द करण्यासाठी सांगलीत मोठ्या आंदोलनाची घोषणा; 31 गावांतील 3 हजार एकरांहून अधिक जमीन बाधित

तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका! डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह बड्या ब्रँड्सवर FDAची धाड; 5 परवाने निलंबित

Independence Day 2026: तिरंगा थीमवर सजवा घर, शाळा अन् ऑफिस! १५ ऑगस्टला नक्की ट्राय करा 'या' भन्नाट डेकोरेशन आयडियाज!

Latest Marathi News Live Update : पावसाळी अधिवेशनादरम्यान सरकारचे अत्यंत अहंकारी वर्तन- कॉंग्रेस

SCROLL FOR NEXT