Bhurya delivering his speech on Independence Day, demanding the implementation of the Laadak Lekaru Scheme. esakal
Trending News

Viral Video: आम्हाले खर्च-पाण्याला पैसे लागतात, लाडकं लेकरू योजना आणा! जालन्यातील व्हायरल भुऱ्याचा सरकारकला सल्ला अन् विनंती

Bhurya Independence Day Speech:  भुऱ्याचं खरं नाव कार्तिक जालिंदर वजीर आहे. कार्तिकला जन्मापासूनच डोळ्यांची समस्या आहे, त्याला दूरचं दिसत नाही. परंतु त्याची तल्लख बुद्धी आणि टॅलेंट पाहून सर्वजण अचंबित होतात. भुऱ्याने यापूर्वीही अनेक भाषणे केली आहेत, ज्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दखल घेतली होती.

Sandip Kapde


स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सोशल मीडियावर भुऱ्या नावाच्या विद्यार्थ्याचं भाषण मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे. देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त भुऱ्याच्या भाषणाने सर्वांच्या मनात जागा मिळवली आहे. भुऱ्याच्या भाषणात त्याने सरकारकडे एक अनोखी मागणी केली आहे. "लाडकं लेकरू योजना" सुरु करण्याची विनंती त्याने केली आहे. भुऱ्याच्या या सल्ल्यानं सर्वत्र चर्चा झाली आहे.

भुऱ्याचं खरं नाव कार्तिक जालिंदर वजीर आहे. कार्तिकला जन्मापासूनच डोळ्यांची समस्या आहे, त्याला दूरचं दिसत नाही. परंतु त्याची तल्लख बुद्धी आणि टॅलेंट पाहून सर्वजण अचंबित होतात. भुऱ्याने यापूर्वीही अनेक भाषणे केली आहेत, ज्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दखल घेतली होती.

लोकशाहीवरील भुऱ्याचं भाषण-

यापूर्वी भुऱ्याने लोकशाहीवर केलेल्या भाषण लोकांना हसवलं होतं. काहींनी त्याच्या लोकशाहीच्या व्याख्येचं कौतुक केलं होतं. मुख्यमंत्र्यांनाही भुऱ्याचं लोकशाही भाषण आवडलं होतं. जालना दौऱ्यावर असताना भुऱ्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी त्याच्या डोळ्यांवरील उपचाराची जबाबदारी मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षामार्फत घेण्यात आली होती.

पोरांना खरंच स्वतंत्र आहे का?

स्वातंत्र्यदिनानिमित्त भुऱ्याने विचारलं, "१५ ऑगस्ट १९४७ ला आपला भारत देश स्वतंत्र झाला. इंग्रज कडू होते पण त्यांना क्रांतीकाऱ्यांनी पाणी पाजलं. परंतु आमच्यासारख्या बारक्या पोरांना खरंच स्वतंत्र आहे का? कोणीही येते आणि आम्हाला काम सांगते. घरातील बारीक सारीख काम आम्ही करतो, रानातील काम आम्ही करतो. सुट्टी असली की घरची कामे, रानातील कामे आम्हाला करावी लागतात."

सरकारने लहान मुलांना पगार सुरू करावा-

भुऱ्याने सरकारला आवाहन केलं की, "मोठ्या मुलांना पगार मिळणार, ते दिवसभर मोबाईलवर गेम खेळून त्यांचं डोकं हँग झालं आहे. आता त्यांना पगार सुरु केला तर ते रानात काम करणार नाहीत. आम्ही बारक्या पोरांनी काय घोडं मारलं? आम्हालाही पगार सुरु करा. आम्हालाही खर्च-पाण्याला पैसे लागतात."

लाडकं लेकरू योजना आणा-

भुऱ्याने सरकारकडे "लाडकं लेकरू योजना" सुरू करण्याची मागणी केली आहे. "सरसकट योजना सुरु करा, मग आम्हाला पगार, मोठ्या मुलांना पगार, मोठ्या माणसांना पगार, लेकीला पगार, सुनेला पगार, सगळ्यांनाच पगार. काम करायची गरज नाही, सर्वांना फुकटच खायची सवय लागेल. बंद करा हे सर्व, काम करायची गरज नाही, अशाने आळशी पिढी तयार होईल. मग पुन्हा इंग्रज येऊन तुम्हाला गुलाम करतील," असे भुऱ्याने म्हटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: बीड लैंगिक छळ प्रकरणात आरोपीचे मोबाईल फॉरेन्सिक लॅबला पाठवले; क्लासेसमधील सहकाऱ्यांचेही जबाब नोंदवले

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचा भीमपराक्रम! भारताचा 'सर्वोकृष्ट' कसोटी कर्णधार ठरला, विराट कोहलीचा मोडला विक्रम

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचे द्विशतक! इंग्लंडमध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय कर्णधार, मोडले अनेक विक्रम

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलसमोर इंग्लंडने गुडघे टेकले! गावस्करांचा ४६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, जगात भारी ६ पराक्रमही केले

Latest Maharashtra News Updates : बालेवाडीत कार्यालयातून १९ लाखांचे विदेशी चलन लंपास

SCROLL FOR NEXT