Viral Sakal
Trending News

'मला नोकरी द्या, नाहीतर मी दुसऱ्यासोबत पळून जाईन'; तरूणीचं थेट उपमुख्यमंत्र्यांना पत्र

तुमचं तर लवमॅरेज झालं पण आमचंही बघा काहीतरी बघा अशी मागणीही तिने केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात. सध्या देशभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात असून अनेकजण आपल्या आवडत्या व्यक्तीला लग्नाची आणि प्रेमाची मागणी घालत असतात. तर सध्या असाच एक फोटो व्हायरल होत असून बिहार येथील एका तरूणीने थेट उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना पत्र लिहिलं आहे.

हेही वाचा - अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

सदर मुलगी प्रभात नावाच्या एका मुलावर एकतर्फी प्रेमात आहे. पण या तरूणीकडे नोकरी नाही. तर मला नोकरीचं काहीतरी जुगाड करून द्या नाहीतर मी दुसऱ्यासोबत पळून जाईल अशी मागणी या तरूणीने उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तर तिने लिहिलेली चिठ्ठी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

Letter

सदर मुलीने लिहिलंय की, "डियर तेजस्वी जी, आपल्याला माहिती आहे की, मी सध्या टेन्शन मध्ये आहे. तुम्ही तर लव मॅरेज केलं पण आमच्या लग्नावर बेरोजगारीचं सावट पसरलं आहे. मी चार वर्षापासून प्रभात बांधूल्या या तरूणावर एकतर्फी प्रेम करते. अफेयरच्या वयात करंट अफेयर वाचत आहे. नोकरी लागल्यावर प्रपोज करेन असा विचार केला होता पण नोकरी लागत नाही. जागाही निघत नाहीत. आणि जागा निघाल्या तर पेपर लीक होतात. हे बघून यावर्षीचा व्हॅलेंटाईनसुद्धा असाच निघून जाईल आणि मी प्रपोज सुद्धा करू शकणार नाही असं वाटतं.

मी परिक्षेचा अभ्यास करतेय आणि माझे वडील माझ्या लग्नाच्या तयारीला लागले आहेत. माझ्या सोबतच्या सगळ्या मैत्रिणींना तर मुलंही झाले. हे बघून मनाला खूप लागतं. मोठ्या आशेने चिठ्ठी लिहित आहे. एखाद्या नोकरीचं जुगाड लावा नाही तर लेखक दुसऱ्या एखाद्यासोबत फरार होईल. प्रेमाशिवाय नोकरी घेऊन काय करणार.. आपलीच मतदार आणि प्रभात बांधूल्याची एकतर्फी प्रेमिका पिंकी (पटणामधून)..." असं पत्र पिंकी या तरूणीने लिहिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

Pune News : पेशवेकालीन भूमिगत जलवाहिनी जीर्णोद्धारास स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी

CGHS नियमांमध्ये मोठा बदल! आता आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्यापैकी एकालाच मेडिकल लाभ मिळणार; नवा नियम लागू

PBKS vs MI Live : शार्दूल ठाकूरची 'स्टम्प' तोड गोलंदाजी! पंजाबने ३३ धावांत गमावले ६ फलंदाज; 'लॉर्ड'च्या ४ विकेट्सने फिरली मॅच Video

SCROLL FOR NEXT