Lion 
Trending News

Viral Video: जेव्हा खासगी कंपनीत होते खऱ्या खुऱ्या सिंहाची एन्ट्री! व्हिडिओ पाहाल तर बसेल धडकी

एका प्रायव्हेट कंपनीचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरलं झालं आहे.

सकाळ डिजिटल टीम

गांधीनगर : सिंह ही गुजरातची ओळख. पण या सिंहाचा पराक्रम पाहून तुम्हाला धक्का बसेल. गुजरातच्या राजुळा इथल्या एका खासगी कंपनीत हे वनराज अवतरले. कंपनीत जेव्हा सिंहाची एन्ट्री झाली तेव्हा काही कर्मचारी देखील या कंपनीत काम करत होते. सिंहाला पाहताच त्यांची बोबडी वळली. हा सर्व प्रकार कंपनीतील सीसीटीव्ही कॅमेरॅत कैद झाला आहे. (Caught on cam Lion enters private company in Gujarat)

सीसीटीव्ही फुटेजनुसार, हा जंगली सिंह थेट कंपनीत शिरला त्यानंतर तो लॉबीमध्ये मनसोक्त फिरत होता. कंपनीच्या मुख्य हॉलमध्येही त्यानं प्रवेश केला. काही कर्मचाऱ्यांनी हा सिंह दिसल्यानं त्यांना धडकीच भरली होती, ते प्रचंड घाबरले होते. कंपनीतील कर्मचाऱ्यांची तक्रार वनखात्याकडं आल्यानंतर या सिंहाचा कंपनीच्या परिसरात कसून शोध घेण्यात आला. पण सिंह काही त्यांच्या हाती लागला नाही.

अमरेली जिल्ह्यातील एका गावात नुकतेच आठ गिरमधील सिंह दिसून आले होते. त्यानंतर चक्क एका खासगी कंपनीतच सिंह घुसऱ्याची ही घटना घडली आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, या भागात सिंह दिसणं ही नेहमीची बातमी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Kolhapur visit cancelled : अमित शहांचा कोल्हापूर दौरा रद्द; प्रकृती अस्वस्थ असल्याने हुबळीतून दिल्लीकडे रवाना

धावती लोकल पकडायला गेला, अचानक तोल जाऊन ट्रेनखाली येणार इतक्यात...; RPF जवानांनी तरुणाला दिले जीवनदान, Video Viral

Babasaheb Patil RBI action : सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर RBIची कारवाई; नियमांचे उल्लंघन केल्याने जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून बडतर्फ?

Western Ghats Biodiversity : सह्याद्रीच्या कुशीत दडलाय अमूल्य खजिना! आजरा परिसरात सापडल्या शेकडो दुर्मीळ औषधी वनस्पती; टाटा संस्थेकडून सर्वेक्षण

दुष्काळात कुणी खाईना का? ५०-६० रुपयांचे ड्रायफ्रूट्स, राईचा पर्वत करायची काय गरज? काजू-बदाम खाणाऱ्या खासदाराची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT